सामाजिक

लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील शालेय विद्यार्थ्यांना ट्रेसेबल गिव्हींग फाउंडेशनच्या वतीने ६३०००/- रुपये किमतीच्या पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप !!

1009933633

पंचनामा प्रतिनिधी – राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे संचलित, न्यू इंग्लिश स्कूल लाखणगाव येथे आज दिनांक २४ जून २०२६ रोजी ट्रेसेबल गिव्हींग फाउंडेशन होंगकोंग च्या वतीने इ ९ वी व इ १० वी च्या विद्यार्थ्यांना रू ६३०००/- किंमतीचे मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उद्योजक सागरशेठ दांगट हे होते. यावेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ गाडगे, मा.अध्यक्ष,उद्योजक सोमनाथ पोंदे, प्रगतशील शेतकरी लहुआण्णा पडवळ, योगेश पाटील, उपसरपंच रवींद्र अरगडे, मुख्याध्यापक अनिल देसले, सर्व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी उद्योजक सागर दांगट यांनी ट्रेसेबल गिव्हींग फाउंडेशनचे कौतुक अभिनंदन करत ऋण व्यक्त केले, पुढील काळात शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन सागर शेठ दांगट यांनी दिले. मुख्याध्यापक अनिल देसले यांनी ट्रेसेबल गिव्हींग फाउंडेशन आणि फाउंडर नरेश सुराणा हाँगकाँग यांचे विशेष आभार व्यक्त करताना सर्वसामान्य, शेतकरी, शेतमजूर, गरीब कुटुंबातील, तळागाळातील विद्यार्थ्यांना ६३०००/- रुपये किंमतीचे मोफत पाठ्यपुस्तक उपलब्ध करून दिल्याबद्दल व व सर्व वर्गात डिजिटल शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त केले.

यावेळी छाया वाघुंडे यांनी सूत्रसंचालन, प्रवीण शिकारे यांनी आभार व कल्पना राजगुरू , अक्षय किर्वे यांनी बैठक व्यवस्था पाहिली.

1009850407

Related posts

मोरडेवाडी शाळेचे दोन विद्यार्थी जाणार युरोप, नासा व इस्रोला !!

Chief Editor

डिंभे धरणाचा उजवा कालवा पाणी नव्हे तर प्लॅस्टिक वस्तू वाहण्याचे उत्तम साधन !!

Chief Editor

शेवभाजी… !!!

Chief Editor

Leave a Comment