सामाजिक

आमरण उपोषणासाठी बसलेल्या धामणी गावच्या ग्रामस्थांना परिसरातील गावांनी दिला जाहीर पाठिंबा; पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत केली चर्चा !!

1009933433

पंचनामा प्रतिनिधी – धामणी ( ता.आंबेगाव ) येथे आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील दुष्काळी परिसर असलेल्या धामणी परिसरातील उपसासिंचन योजनांच्या शेतीपंपांना त्वरित वीज कनेक्शन द्यावे या मागणीसाठी मा.सरपंच सागर जाधव यांच्यासह एकूण २५ शेतकरी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणास बसले असून बुधवार (दि.२३) उपोषणकर्त्यांचा तिसरा दिवस असून ग्रामस्थांनी व परिसरातील गावातील ग्रामस्थांनी आपला पाठिंबा जाहिर केला असून, ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना आता आत्महत्या करण्याची वेळ आली तरी चालेल पण आता माघार घेणार नाही असे सांगितले.

जवळ-जवळ धामणी परिसरातील शेती उपसासिंचन योजनेसाठी येथील शेतकर्यांनी सात कोटी रुपये खर्च केले असून विशेषता महावितरण कंपनीच्या एकाही अधिकार्यांनी उपोषण स्थळी भेट दिली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.शिवाय तालूका पातळीवरील एकाही जबाबधार अधिकार्यांनी येथे भेट न दिल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

उपोषण स्थळी जिल्हा परिषदेचे उपाध्याक्ष विवेक वळसे पाटील, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर,पंचायत समिती सदस्या अंकिता वाळूंज यांनी भेट देऊन उपोषणकर्यांशी चर्चा केली.

यावेळी विवेक वळसे पाटील म्हणाले की,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडून या प्रकल्पाला सकारात्मक भूमिका आहे.गेल्या महिन्यात राज्याचे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशजी चंद्रा यांसमवेत वीज कनेक्शन देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली होती.त्या अनुषंगाने महावितरण, पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसमवेत संयुक्त पाहणी करुन या विषयाला अनुकूलता दर्शविली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या उपोषणास भेट देऊन त्यांच्या मागणी समजावून घेतल्या. स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही,याबाबत उपस्थितांना ग्वाही दिली.

यावेळी आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे मा.अध्यक्ष अनिल वाळुंज, जारकरवाडी पंचायत समिती गणाच्या सदस्या अंकिता वाळुंज,मा.सरपंच बाळासाहेब विधाटे,प्रतिक जाधव,देविदास करंजखेले तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

1009933433

धामणी ( ता.आंबेगाव ) येथे उपोषणस्थळी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी भेट दिली.

Related posts

तरुणांनी मोठ्या संख्येने पायी वारीत सहभागी व्हावे – ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील

Chief Editor

समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये आचार्य सुश्रुत जयंती व महाकवी कालिदास दिन उत्साहात साजरा !!

Chief Editor

वडजादेवी गणेश मंडळाचा धार्मिक व सामाजिक उपक्रमांचा आदर्श ; कीर्तन सेवा, महिलांची महाआरती अन् विविध सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सवाला विधायक वळण !!

Chief Editor

Leave a Comment