सामाजिक

लोणीत ७० शेतकऱ्यांना तुषार सिंचन संचांचे वाटप ; लुपिन फाउंडेशन व व्हर्लपूल कंपनीचा संयुक्त उपक्रम ; कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यास मिळणार चालना !!

1011705338

पंचनामा प्रतिनिधी – लोणी (ता. आंबेगाव) येथे लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन, पुणे आणि इलिका पी. बी. व्हर्लपूल किचन अप्लायन्सेस प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘उपजीविका विकासासाठी जलसंसाधन प्रकल्पा’अंतर्गत ७० शेतकऱ्यांना तुषार सिंचन संचांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक शेतकऱ्याला एक एकर क्षेत्रासाठी सिंचन संच उपलब्ध करून देण्यात आल्याने पाण्याची बचत होण्याबरोबरच कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

परिसरात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पाण्याचे काटेकोर नियोजन करणे ही शेतकऱ्यांसमोरील मोठी समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत तुषार सिंचन पद्धतीमुळे भाजीपाला तसेच अन्य पिकांना कमी पाण्यात प्रभावी सिंचन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे पाणी बचतीसोबतच शेती उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षात लोणी गावात आठ सिमेंट बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच गावातील तीन पाझर तलावांमधील गाळ काढण्यात आला असून जिल्हा परिषद शाळा, लोणी आणि उपबाजार समिती मंचर बाजार आवार, लोणी येथे रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या जलसंधारणाच्या कामांमुळे पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यास आणि भूजल पातळी वाढविण्यास हातभार लागला आहे.

या कार्यक्रमास लोणीचे सरपंच सावळाराम नाईक, शरद बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, माजी सरपंच उद्धव लंके, जारकरवाडी पंचायत समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बाळशिराम वाळुंज, उपसरपंच राजेंद्र वाळुंज, पोलीस पाटील संदीप आढाव, भैरवनाथ विद्याधाम लोणीचे शिक्षण समिती सदस्य संतोष पडवळ, रमेश खोमणे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी लुपिन फाउंडेशनचे तालुका व्यवस्थापक प्रताप मोटे यांनी तुषार सिंचन संचांच्या माध्यमातून भाजीपाला पिकांना पाणी देण्याचे नियोजन आणि कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. फिनोलेक्सचे रोहित कदम यांनी संचांची जोडणी, वापर आणि देखभाल याविषयी माहिती दिली. लुपिन फाउंडेशनचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी बाळासाहेब बोऱ्हाडे व मच्छिंद्र खरात उपस्थित होते.

कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या वतीने उपस्थित अधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. बाळशिराम वाळुंज यांनी उपस्थितांचे आभार मानले.

1011703618
1011705466

Related posts

गणपती बाप्पाच्या आगमनाआधी लोणी (धामणी) गावावर कोसळला दुःखाचा डोंगर ; शकील सय्यद यांचा अपघाती मृत्यू ; बेल्हा-जेजुरी महामार्गावरील अपघाताने लोणी गाव हादरले

Chief Editor

अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे) गावचे मा.उपसरपंच श्री.विठ्ठल सिताराम ढोबळे यांनी जपली सामाजिक बांधिलकी; वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून रक्तदान शिबिराचे आयोजन!!

Chief Editor

Leave a Comment