सामाजिक

अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन !!

img 20260122 wa0485

पंचनामा मंचर प्रतिनिधी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक व उपसंचालक कार्यालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन महाळुंगे पडवळ,माळवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज, नारायणगाव येथील प्रा. डॉ. शिवाजी टाकळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

img 20260122 wa0461

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. शिवाजी टाकळकर म्हणाले की, “राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी एक प्रभावी माध्यम असून समाजभान, स्वयंशिस्त व नेतृत्वगुण विकसित करण्यास मदत करते. श्रमसंस्कारातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्याम मिसाळ होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण विकास, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. सदर कार्यक्रमास सरपंच सौ. सुजाता चासकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. उपसरपंच सौ.अलका पडवळ, सौ.जयश्री दहीतुले, मा. श्री. बाबाजी चासकर, मा. श्री. प्रदीप डोके, मा. श्री. सुदाम पडवळ, मा. श्री. सचिन चासकर आणि इतर ग्रामस्त उपस्थित होते. तसेच उपप्राचार्य अविनाश झावरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. सपना पाटील, प्रा. रविंद्र पारधी इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

img 20260122 wa0463

सदर कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. एस. उघडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. ज्ञानेश्वर टेकाळे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

fb img 1768108641525

Related posts

निधन वार्ता – कै.सौ.कलाबाई नामदेव सुक्रे यांचे अल्पशा आजाराने निधन..

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) गावाने महिलांसाठी राबविला नाविन्यपूर्ण उपक्रम!!

Chief Editor

समर्थ जुनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के;इकरा फातिमा वसीउल्ला मलिक ९० टक्के गुणांसह प्रथम !!

Chief Editor

Leave a Comment