सामाजिक

तब्बल २६ वर्षांनी पुन्हा भरला वर्ग; माजी विद्यार्थ्यांचा सस्नेह मेळावा उत्साहात संपन्न !!

1010606112
1010606112


देवगाव, ता. आंबेगाव : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सन २०००-२००१ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता सातवीच्या माजी विद्यार्थ्यांचा सस्नेह मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. तब्बल २६ वर्षांनंतर माजी विद्यार्थी एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
ज्या वर्गात बालपणीचे अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवले, त्याच शाळेत पुन्हा एकदा एकत्र येण्याचा आनंद माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. यावेळी जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी, आठवणींची देवाणघेवाण आणि हास्य-विनोदामुळे वातावरण भावूक तसेच आनंदमय झाले.
या मेळाव्यास तत्कालीन गुरुजनांची विशेष उपस्थिती लाभली. सुदाम घोडे, रापाटील गुरुजी, तुकाराम ताथवडे, किसन गुरुजी, जयराम थोरात गुरुजी, कोडिंका जोरी, कमल जोरी आदी गुरुजन उपस्थित होते.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. गुरुजनांनीही माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षक-विद्यार्थ्यांच्या नात्यातील जिव्हाळा २६ वर्षांनंतरही कायम असल्याचे या मेळाव्यातून दिसून आले.
“काळ पुढे गेला, आयुष्याच्या वाटा बदलल्या; मात्र शाळेच्या आठवणी आणि गुरुजनांबद्दलचा आदर आजही मनात तितकाच जिवंत आहे,” अशी भावना उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
तब्बल २६ वर्षांनंतर पुन्हा भरलेला हा सस्नेह मेळावा जुन्या आठवणी, गुरुजनांचे आशीर्वाद आणि मैत्रीच्या नात्याचा अविस्मरणीय सोहळा ठरला.

1010457105

Related posts

७९ व्या संत समागमाच्या सेवांचा मंगलमय शुभारंभ, सेवा ठरली समर्पणाची साधना !!

Chief Editor

कोलंबो येथे ‘इंडियन पोलीस मित्र भारत इंटरनॅशनल अवॉर्ड – श्रीलंका २०२६’ उत्साहात !!

Chief Editor

समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू;आरोग्यसेवेतील उज्ज्वल भविष्यासाठी सुवर्णसंधी;‘नर्सिंग’ हे क्षेत्र केवळ नोकरीपुरते मर्यादित नसून समाजसेवेचे एक प्रभावी माध्यम- वल्लभ शेळके

Chief Editor

Leave a Comment