सामाजिक

आद्य संस्थापक दत्तात्रय वळसे पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

1009464651
1009464651

पंचनामा प्रतिनिधी – दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे आद्य संस्थापक स्व. दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील, (दादा) यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्त कारखाना कार्यस्थळावर स्मारकस्थळी व भीमाशंकर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात विनम्र आदरांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, ज्ञानेश्वर अस्वारे, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे, संचालिका प्रिया बाणखेले, जनरल मॅनेजर शिरीष सुर्वे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, किशोर तिजारे, दिलीप कुरकुटे, प्रतापसिंह सावंत, सुरेश शिंदे, अमीर पठाण, ब्रिजेश लोहोट, अनिल बोंबले, कैलास गाढवे, बी.डी.चव्हाण, नाथा मोकाटे, वसंत जाधव, कामगार व शिक्षक वृंद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, स्व. दत्तात्रय वळसे पाटील यांच्याबाबत मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, दादांनी आयुष्यभर जनसामान्य शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून कार्य केले. दुष्काळी परीस्थितीशी झुंजणा-या आंबेगाव तालुक्यात शिक्षण, सहकार, सिंचन आणि पायाभूत सुविधांची जी विकासदृष्टी त्यांनी रुजवली त्याच विचारामधून आजचा प्रगत तालुका घडताना दिसतो. दादांची कार्यपद्धती, लोकांशी जोडलेली नाळ आणि समाजकारणाकडे पाहण्याची सर्वसमावेशक भूमिका हे आजही प्रेरणा देणारे आहे. त्यांनी जपलेली विकासाची आणि जनसेवेची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

1009464651

स्मारकस्थळी अभिवादन करताना व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, मा. संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वृंद.

Related posts

मांदळेवाडी (ता.आंबेगाव) येथे वादळी वारा आणि पावसाने झाले शेतकऱ्यांचे नुकसान !!

Chief Editor

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात हुमणीचा प्रादुर्भाव!!

Chief Editor

श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागांतर्गत ”व्यक्तिमत्व विकास ” कार्यशाळेचे आयोजन !!

Chief Editor

Leave a Comment