सामाजिक

मांदळेवाडीत बिबट्याचा वाढला वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण ; वडगावपीर-मांदळेवाडी रस्त्यावर रात्री बिबट्याचे दर्शन; वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी !!

1011216916

पंचनामा प्रतिनिधी : मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वडगावपीर-मांदळेवाडी रस्त्यावर रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन होणे नित्याचेच झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे या परिसरात वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

मंगळवारी (दि. ६) रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास माजी उपसरपंच नवनाथ मांदळे, सोसायटी संचालक फकिरा आदक व प्रताप मांदळे हे लोणीहून मांदळेवाडीकडे चारचाकी वाहनाने जात होते. त्यावेळी उंबरखोरी येथे रस्त्याच्या कडेला बिबट्या ऐटीत रस्ता ओलांडताना त्यांना दिसला. वाहनाचा हॉर्न वाजविल्यानंतरही बिबट्याने घाबरून न जाता रस्ता ओलांडला आणि शेजारील झाडीत निघून गेला.

दरम्यान, सुमारे आठ दिवसांपूर्वी वडगावपीर येथील बैलगाडा घाटाजवळही रात्रीच्या वेळी बिबट्या दिसल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे मांदळेवाडी, वडगावपीर परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचे चित्र आहे.

या परिसरात बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच उज्वला आदक, उपसरपंच रवि ढगे पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

‘मोठी घटना घडण्यापूर्वीच उपाययोजना करा’

बिबट्या दिसल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. मात्र, एखादी मोठी घटना घडण्याची वाट न पाहता वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

1011111248

Related posts

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडू निवड चाचणी होणार १४ व १५ जुलै रोजी !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारीमळा (मेंगडेवाडी) येथे उत्साहात संपन्न झाला मातृ पितृ पूजन दिवस!!

Chief Editor

खडकवाडी (ता.आंबेगाव) येथे संपन्न होणार भैरवनाथ यात्रा महोत्सव !!

Chief Editor

Leave a Comment