सामाजिक

आदर्श विद्यालयाच्या खो-खो संघांची तालुकास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी ; १७ वर्षांखालील मुले व १४ वर्षांखालील मुलींच्या संघांना द्वितीय क्रमांक !!

1011216811
1011216811

पंचनामा प्रतिनिधी -जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाने खो खो तालुकास्तरीय स्पर्धात १७ वर्षाखालील मुले व १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद पुणे आणि आंबेगाव तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रांजणी ( ता. आंबेगाव ) येथे तालुका स्तरावरील शालेय क्रीडा पार पडल्या यावेळी आंबेगाव तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत आक्रमक व शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांना कडवी झुंज दिली.

या यशासाठी विद्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक मोमीन सर व संजय वळसे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंचा सराव, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे विद्यालयाला हे यश मिळाले.

यशस्वी खेळाडू तसेच क्रीडा शिक्षकांचे विद्यालय प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले. या कामगिरीमुळे आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा अधिक बळकट झाली असून पुढील स्पर्धांसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

1011111277

Related posts

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने पारगाव (शिंगवे) येथे संपन्न झाले गुरूचरित्र पारायण, गृह पठण !!

Chief Editor

धामणी गावात नारी शक्ती बोलती झाली;महिला दिनी उलगडली स्वकर्तुत्वाची गाथा !!

Chief Editor

जिल्हा परिषद शिंगवे शाळेला A+ श्रेणी मानांकित !!

Chief Editor

Leave a Comment