सामाजिक

लोणी (धामणी) येथे जलतारा उपक्रमाची सुरुवात !!

img 20260418 wa0429
img 20260418 wa0429

पंचनामा प्रतिनिधी – लोणी (ता.आंबेगाव ) येथे लोणी गावातील पोलीस पाटील संदीप आढाव यांच्या शेतामध्ये पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आणि भूगर्भातील जलसाठा वाढवण्यासाठी ‘जलतारा चळवळीचा’ शानदार शुभारंभ करण्यात आला.

काही दिवसापूर्वी ग्रामस्थांनी सरपंच डॉ.सावळेराम नाईक यांच्या आवाहनाला साथ देऊन जलसारा संशोधन केंद्र- विठ्ठला फॉर्म,वाटूर. ता.परतुर जि. जालना ) या ठिकाणी डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांच्या शेतीमध्ये जाऊन जलतारा प्रकल्पाचे पाहणी करून आले होते.

लोणीच्या पश्चिमेला शेतीसाठी पाण्याचा स्त्रोत कमी असल्याने महाराष्ट्र राज्याचे महसूल विभागाचे सहसचिव डॉ. कैलास गायकवाड व लोणीचे सरपंच डॉ. सावळेराम नाईक यांच्या मार्गदर्शक सूचने नुसार ग्रामस्थांनी अभ्यास दौरा आयोजित केला होता.त्यानुसार लोणी गावचे पोलीस पाटील संदीप आढाव यांनी स्वतःच्या शेतीमध्ये प्रथम हा प्रयोग सुरू केला आहे.या प्रकल्पाचे उद्घाटन महसूल विभागाचे सहसचिव डॉ.कैलास गायकवाड यांचे हस्ते झाले. त्यांनी विशेष वेळ देऊन उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. व गावामध्ये सर्व शेतकऱ्यांनी जलतारा प्रकल्पाचे आपापल्या शेतामध्ये प्रयोग करावेत व भूगर्भातला पाणीसाठा कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले.

यावेळी माजी विद्यार्थी विकास प्रबोधनीचे खजिनदार बाळासाहेब गायकवाड, प्रकाश गायकवाड, शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक पाटील,ग्रामपंचायत उपसरपंच राजेंद्र वामन वाळुंज,रंगनाथ वाळुंज पाटील,उद्योजक लहू गायकवाड, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक चंद्रकांत गायकवाड, समाजभूषण कैलासराव गायकवाड ग्रामपंचायत अधिकारी अनिल टेमकर,पोपट फकीरा गायकवाड विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

img 20260418 wa0429

लोणी ( ता.आंबेगाव ) येथे जलतारा प्रकल्प उद्धघाटन करताना मान्यवर ग्रामस्थ.

fb img 1774661444136

Related posts

वृक्षवल्ली मित्र परिवारातर्फे शिरदाळे येथे १०० देशी वृक्षांचे वृक्षारोपण !!

Chief Editor

तमाशा क्षेत्रातील तेजस्वी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व मंदाराणी खेडकर !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे ) गावात जपली जातेय वीर देवाची शेकडो वर्षांची परंपरा !!

Chief Editor

Leave a Comment