सामाजिक

जुनं ते सोनं ;आमच्या शिरदाळे गावातील धोतर टोपी,नेहरू-पायजमा मधील ही कदाचीत शेवटची पिढी असेल ….!!!

img 20260221 wa0525

पंचनामा संपादकीय – धोतर-टोपी आणि नेहरू-पायजमा हा पेहराव म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाची ओळख.त्यातल्यात्यात उत्तर पुणे जिल्हा असेल आंबेगाव तालुका असेल यांची खास ओळख म्हणजे डोक्यावरील पांढरी तिरकी टोपी अर्थात मंचरी टोपी !!! हा ग्रामीण भागातील सामान्य माणसाची ओळख असणारा पेहराव काळाच्या ओघात नस्ट होत चालला आहे.पँट शर्ट आणि इतर फॅशनच्या कपड्यांनी पारंपारिक कपड्यांना मात्र कालबाह्य करून टाकले आहे.

पूर्वी ग्रामीण भागातील शेतकरी पांढरा सदरा, टोपी ,धोतर आणि कोपरी असा पेहराव परिधान करून आपला दैनंदिन व्यवहार करायचे आजही त्या पिढीतील जेष्ठ मंडळी त्याच पोशाखात पाहायला मिळतात…आज आमच्या शिरदाळे गावच्या वेशीत सहज त्या पिढीतील आठ दहा मंडळी एकत्र बसलेली पाहायला मिळाली.हे चित्र पाहून मनाला समाधान वाटले आणि फोटो काढण्याचा मोह झाला.त्या सर्वांनी राहील अगदी हसरी मुद्रा देऊन फोटोला प्रतिसाद दिला.

हल्लीच्या या धावपळीच्या जीवनात जुन्या गोष्टी लोप पावत चालल्या आहेत.खर तर त्याचे आपण जतन करण्याची गरज आहे.परंतु काळासमोर कोणाचे काही चालत नाही.काही बदल हे नको असताना पण आपल्याला स्वीकारावे लागतात.

fb img 1771121534243

Related posts

जवळे (ता.आंबेगाव) येथे उत्साहात संपन्न झाला प्रजासत्ताक दिन!!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडीच्या शिरपेचात मनाचा तुरा!!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी (पिंपळगाव) येथे सावित्रीच्या लेकींचे सावित्रीबाईंना विनम्र अभिवादन!!

Chief Editor

Leave a Comment