सामाजिक

जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायतने राबविला आहे अनोखा उपक्रम!!

img 20260122 wa0206

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या व ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या ग्रामपंचायत जवळेने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने अभिनव उपक्रम राबविला आहे.मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना दशक्रिया घाटावरच मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

ग्रामपंचायत जवळे गावच्या आदर्श सरपंच सौ.वृषालीताई उत्तम शिंदे पाटील, उपसरपंच मनीषा टाव्हरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत अधिकारी शीला साबळे या सर्वांच्या निर्णयानुसार जवळे गावातील मृत व्यक्तींचे मृत्यू प्रमाणपत्र( दाखला) हा दशक्रिया घाटावरती देण्यात येत असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे तसेच सरपंच यांचे कौतुक करण्यात येत आहे.

fb img 1768108641525

कै.केरभाऊ नामदेव टाव्हरे,कै. सखुबाई सहादु बरकडे यांचे मृत्यू प्रमाणपत्र हे दशक्रिया विधी संपन्न झाल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांच्या कुटुंबीयांना वितरित करण्यात आले. अशी माहिती मा.सरपंच विद्यमान सदस्य हरिचंद्र शिंदे पाटील व दत्तात्रय लायगुडे पाटील यांनी दिली.

Related posts

ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे भरवस्तीत बिबट्याचा कालवडीवर हल्ला !!

Chief Editor

शेतकऱ्यांच्या थकबाकी रक्कमेत तफावतीसंदर्भात योजनेच्या पोर्टलवरील थकबाकीची रक्कम ग्राह्य धरावी- सहकार आयुक्त दिपक तावरे

Chief Editor

मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी मानक कार्यप्रणाली जाहीर !!

Chief Editor

Leave a Comment