सामाजिक

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात चारा टंचाईचे संकट झाले गडद !!

1009786504

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर, मांदळेवाडी ,लोणी,पहाडदरा,शिरदाळे परिसरात पाऊस लांबणीवर पडल्याने चारा टंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. या भागात गोपालन व दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने चाऱ्याअभावी शेतकरी व पशुपालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

यावर्षी मान्सूनच्या उशिरामुळे शेतांमध्ये हिरवा चारा उपलब्ध झाला नसून अनेक ठिकाणी जनावरांसाठी आवश्यक चारा व पाण्याची कमतरता भासत आहे. परिणामी दूध उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुग्ध व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

जनावरांना पुरेसा चारा मिळत नसल्याने पशुधनाचे आरोग्य धोक्यात आले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. चारा खरेदीसाठी वाढत्या खर्चामुळे पशुपालकांचे आर्थिक गणितही कोलमडले आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने या परिसरात चाऱ्याची उपलब्धता करून द्यावी तसेच आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी वडगावपीरचे माजी सरपंच संजय पोखरकर आणि मांदळेवाडी येथील उद्योजिका ज्योती गोरडे यांनी केली आहे.

1009777264
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 353520
1009760330
1009760332
1009790278
1009793449

Related posts

अण्णासाहेब आवटे कॉलेजला तब्बल ३६ वर्षांनी पुन्हा एकदा भरला वर्ग !!

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायत प्रशासनाची तत्परता ; मृत गाय आणि मेलेल्या कोंबड्यांची तत्काळ लावली विल्हेवाट !!

Chief Editor

तंबूतल्या तमाशाला डिजिटल रूप देणारा निस्वार्थी अवलिया – अनिल रामचंद्र बनसोडे

Chief Editor

Leave a Comment