
पंचनामा प्रतिनिधी – लोणी जारकरवाडी मार्गे मंचर या रस्त्यावर जारकरवाडी – येथील लबडेवस्ती विद्युत डीपी जवळ रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने लहान मोठ्या वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. संबंधीत विभागाने रस्त्यावरील खड्डा त्वरीत बुजवावा अशी मागणी जारकरवाडीचे मा.उपसरपंच सचिन टाव्हरे व वाहन चालकांनी केली आहे.
लोणी ते जारकरवाडी मार्गे मंचर हा रस्ता या भागातील महत्वाचा रस्ता असून शिरूर तालुक्यातील केंदूर,पाबळ, कान्हुरमेसाई या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात याच रस्त्याने निरगुडसर,अवसरी खुर्द,मंचर,घोडेगाव या ठिकाणी महत्वाच्या कामासाठी येत असतात, शिवाय लोणी,धामणी परिसरातील ग्रामस्थांना सुद्धा मंचरला जाण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. या खड्ड्याचा लहान मोठ्या वाहन चालकांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे हा खड्डा त्वरीत बुजवण्यात यावा अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.
आता पावसाळा नजदिक आला असून जर पावसाळ्यापूर्वी हा खड्डा दुरुस्त केला नाही तर मात्र या रस्त्यावरून प्रवास करणे सुद्धा अवघड जाईल. या ठिकाणी खड्डा पडण्याचे कारण असे की, जेथे खड्डा पडला तेथून पाईप लाईन गेली आहे. व ती लिकीच झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. आणि त्याच खडुयाचा सर्वच वाहन चालकांना त्रास होत आहे.

लोणी मंचर (ता.आंबेगाव ) रस्त्यावर लबडेवस्ती येथे रस्त्यावर पडतेला खड्डा






