सामाजिक

निरगुडसर मंडळ कार्यक्षेत्रात कृषी अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा !!

fb img 1787625523412
fb img 1787625523412

पंचनामा प्रतिनिधी – निरगुडसर (ता. आंबेगाव ) येथील मंडळ कार्यक्षेत्रातील वडगावपीर, मांदळेवाडी येथील विविध योजना अंतर्गत दिलेल्या लाभांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत पीक प्रात्यक्षिके, कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत पीक प्रात्यक्षिके, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड, पीएमएफएमई अंतर्गत अनुदान प्राप्त लाभार्थी यांची पाहणी करण्यात आली.

यावेळी तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी विविध योजना अंतर्गत लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन योजनांविषयी माहिती घेतली तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. अन्न व पोषण सुरक्षा अभियान अंतर्गत वितरित करण्यात आलेल्या बलवान या संकरित वाणाविषयी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले तसेच यावर्षी बाजरीचे उत्पादन विक्रमी येण्याविषयी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन केले तसेच कृषी विभागाच्या योजनाविषयी समाधान व्यक्त केले.

या दौऱ्यासाठी तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, मंडळ कृषी अधिकारी प्रसन्न जाधव, उप कृषी अधिकारी अरुण जोरी, सहाय्यक कृषी अधिकारी प्रवीण मिरके व विकास गवई उपस्थित होते.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 379001
1010760540

Related posts

पारगाव (शिंगवे ) गावात जपली जातेय वीर देवाची शेकडो वर्षांची परंपरा !!

Chief Editor

Chief Editor

समर्थ ज्युनिअर कॉलेज, बेल्हेचा एम.एच.टी.-सीईटी २०२६ मध्ये यश !!

Chief Editor

Leave a Comment