सामाजिक

विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंस्कार रुजविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा : शिक्षण विस्तार अधिकारी शैला निमसे

1011540037

पंचनामा प्रतिनिधी – शिक्षणातून केवळ ज्ञानप्राप्ती न होता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, सहकार्य, जबाबदारी आणि सामाजिक जाणीव यांसारखी मूल्ये विकसित करण्यासाठी शिक्षकांनी मूल्यवर्धन उपक्रमांचा दैनंदिन अध्यापनात समावेश करावा. शाळांमधील शैक्षणिक उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासकीय समन्वय आणि शिक्षकांचे सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे असतात. चांडोली केंद्रातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, नवोदय आणि अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये मिळविलेले यश ही केंद्राच्या शैक्षणिक गुणवत्तेची ओळख असल्याचे मत पंचायत समिती आंबेगावच्या शिक्षणविस्तार अधिकारी शैला निमसे यांनी व्यक्त केले.

1011540037

चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मूल्यवर्धन शिक्षक उजळणी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद पुणे, शांतिलाल मुथ्था फाउंडेशन आणि पंचायत समिती आंबेगावच्या गटशिक्षणाधिकारी रुपाली धोका यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या परिषदेत निमसे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले.

कार्यक्रमाला केंद्रप्रमुख सीमा कहडणे, राहुल रहाटाडे, फाउंडेशनच्या तालुका समन्वयक स्मिता वाळुंज, उपसरपंच अमोल दाभाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाबळे, उपाध्यक्ष अतुल इंदोरे, सदस्या प्रतिभा इंदोरे, प्रियांका इंदोरे, मुख्याध्यापक हेमराज भदाणे, दीपाली अजाब, मीना निऱ्हाळी, कृष्णराव हुले, मंगलादेवी पवार, सुनीता खेबडे, सतीश वाव्हळ, रवींद्र थोरात, नामदेव तळपे, दत्ता गोरडे, विजय थोरात, सुधीर चिखले, निलम आल्हाट, भानुदास बटवाल, विशेष शिक्षिका स्वाती पडवळ यांच्यासह पंधरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील सत्तर शिक्षक उपस्थित होते.

1011540018

परिषदेच्या प्रशिक्षण सत्रामध्ये शिक्षकांना प्रत्यक्ष अध्यापनात उपयोगी पडणाऱ्या विविध तंत्रांची माहिती देण्यात आली. स्मिता वाळुंज यांनी ‘नो हँड टेक्निक’, शांतता संकेत आणि शिक्षकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. तुषार शिंदे यांनी मूल्यवर्धनाची संकल्पना, मूल्यक्षमता आणि अध्ययन निष्पत्ती यांची माहिती दिली. मोनिका वाडेकर यांनी मूल्यवर्धनाची सहा लक्ष्ये स्पष्ट करून विविध उपक्रमांचे प्रात्यक्षिक दाखविले. शिक्षकांनी गटचर्चा व गटकार्याच्या माध्यमातून वर्गात हे उपक्रम कशा पद्धतीने राबविता येतील, याचे सादरीकरण केले.या वेळी पदवीधर शिक्षक रोहिदास सोनवणे,आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था सभापती कान्होबा डोंगरे,थोरांदळे शाळेचे पदवीधर शिक्षक संदीप शिंदे,तालुका शिक्षक संघ कार्याध्यक्ष विजय डोके, शिंदेवाडी (एकलहरे) शाळेचे उपक्रमशील शिक्षक संतोष थोरात आणि पांढरीवस्ती शाळेच्या शिक्षिका शितल साबळे यांचा सत्कार करण्यात आला.

शिक्षिका सुरेखा उनवणे, महानंदा मगरे, परवेज तांबोळी, साधना जाधव आणि रूपाली एरंडे यांनी परिषदेचे संयोजन केले.मुख्याध्यापक कृष्णराव हुले यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. निर्मला डुंबरे यांनी सूत्रसंचालन केले, तर बाळासाहेब कानडे यांनी आभार मानले. सामूहिक वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

1011539996
1011523562
1011523595

Related posts

समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षक-प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न !!

Chief Editor

राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त पंचायत समिती आंबेगाव तर्फे अंगणवाडी सेविकांचा सत्कार !!

Chief Editor

भैरवनाथ सांस्कृतिक महोत्सव खडकवाडी येथे उत्साहात संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment