सामाजिक

भैरवनाथ सांस्कृतिक महोत्सव खडकवाडी येथे उत्साहात संपन्न !!

img 20260405 wa0732
img 20260405 wa0732

पंचनामा प्रतिनिधी – सालाबाद प्रमाणे याही वर्षी भैरवनाथ महोत्सव जल्लोष 2026 हा सांस्कृतिक कार्यक्रम खडकवाडी येथे उत्साहात पार पाडला या कार्यक्रमाचे आयोजन सर्व अंगणवाडी,जि.प.प्राथमिक शाळा खडकवाडी,माध्यमिक शाळा खडकवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा समावेश करण्यात आला.त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन प्रसंगाचा देखावा दाखवण्यात आला.शेतकरी नृत्य,कोळी नृत्य,शिवरायांवरची गाणी तसेच महती संतांची हे नाटक विद्यार्थ्यांनी सादर केले.

fb img 1774661444136

या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ,पालक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष सर्व सदस्य तसेच पालक वर्ग खडकवाडीचे ग्रामस्थ, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष,उपाध्यक्ष सर्व सदस्य यांनी मोलाचे योगदान केले.

(वृत्त संकलन पंचनामा संपादक -संतोष पाचपुते)

Related posts

शाळेतील किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम !!

Chief Editor

वैदवाडी (जारकरवाडी ) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवींना विनम्र अभिवादन !!

Chief Editor

देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील दोन अमृत रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण !!

Chief Editor

Leave a Comment