सामाजिक

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे येथे हार्डवेअर अँड नेटवर्किंग कार्यशाळा संपन्न !!

img 20260820 wa0484
1010637975

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे येथे संगणक अभियांत्रिकी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘हार्डवेअर अँड नेटवर्किंग’ या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना संगणक हार्डवेअर आणि नेटवर्किंगची माहिती देण्यासोबतच त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देणे हा होता. कार्यशाळेत संगणकातील विविध हार्डवेअर घटक, त्यांची ओळख, कार्यपद्धती, संगणकाची रचना तसेच हार्डवेअरशी संबंधित सामान्य तांत्रिक अडचणी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच नेटवर्किंग म्हणजे काय, नेटवर्कचे विविध प्रकार, नेटवर्कमध्ये वापरली जाणारी उपकरणे, संगणकांना नेटवर्कशी जोडण्याची पद्धत आणि नेटवर्किंगमधील प्राथमिक बाबी यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विषय समजावून सांगण्यात आल्याने त्यांना शिकलेल्या बाबी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता आल्या.

कार्यशाळेदरम्यान प्रा. मृणाल डहाळे, प्रथमेश धोत्रे, सतीश पवार आणि सिद्धेश अहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या शंकांचे निरसन करून हार्डवेअर व नेटवर्किंगशी संबंधित आवश्यक माहिती सोप्या पद्धतीने देण्यात आली.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात संगणक आणि नेटवर्किंगचे ज्ञान विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. अभ्यासक्रमातील विषयांसोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तांत्रिक ज्ञान मिळावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि भविष्यातील नोकरी व उद्योगक्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये विकसित व्हावीत, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,व्यवस्थापन, संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा.स्नेहा शेगर,जनसंपर्क अधिकारी डॉ.शरद पारखे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत उपक्रमाचा लाभ घेतला.

विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे उपयुक्त आणि ज्ञानवर्धक उपक्रम नियमितपणे आयोजित केल्यामुळे त्यांच्या शैक्षणिक ज्ञानासोबतच व्यावहारिक कौशल्यांच्या विकासासही मदत होत असल्याचे यावेळी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके सर म्हणाले.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

1010560300
1010457105

Related posts

फुलांचे भाव घसरले; बळीराजा सापडला आर्थिक संकटात !!

Chief Editor

आई वडिलांची,देशाची सेवा करा; तरुणांनी व्यसनापासून दूर रहा – ह. भ.प.निवृत्ती महाराज देशमुख

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अवसरी बु.शाळेने राज्यात पटकावला तेरावा क्रमांक !!

Chief Editor

Leave a Comment