सामाजिक

उन्हाळ्याची चाहूल लागताच माठांची मागणी वाढली; ‘गरीबांचा फ्रीज’ पुन्हा घराघरांत पोहचणार !!

img 20260405 wa0567
img 20260405 wa0567

पंचनामा प्रतिनिधी – उन्हाची चाहुल लागताच अनेकांचे पाय गरीबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा माठ यांच्याकडे वळत असल्याचे दृश्य सध्या अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे.अनेक गावातील आठवडे बाजारात माठ विक्रीला येत असुन पारगाव शिंगवे येथील बाजारात ग्राहकांची माठ खरेदी करण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली.

मार्च एप्रिल महिना सुरु झाल्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणारे माठ ठिकठिकाणी विक्रीस आलेले पहावयास मिळत आहेत.

माठाचे पाणी आरोग्यासाठी लाभदायक असून या पासून अनेक फायदे होत असतात. यामुळे अनेकजण उन्हाळ्यामध्ये माठ खरेदी करीत असतांना पहावयास मिळत आहे. होळीच्या नंतर उन्हाची दाहकता वाढत आहे.यामुळे या माठाचे महत्व आजही आबाधित आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात सर्वसामान्यांची तहान भागविण्यासाठी पाणपोई म्हणून या माठाचा हॉटेल, तसेच विविध ठिकाणी वापर केला जात असल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी उन्हाळ्याच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहे.फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस उन्हाच्या झळा सौम्य स्वरुपाच्या होत्या मात्र होळीच्या नंतर उन्हाचा दाह वाढू लागलेला पहावयास मिळत आहे.

img 20260405 wa0566

यामुळे येणारा उन्हाळा तीव्र स्वरूपाचा होणार असल्याचे तर्क नागारिक यांच्या कडून वर्तवले जात आहे. उन्हाळ्यांची चाहूल लागताच आपली तृष्णा शांत करण्यासाठी अनेकजण थंड पेय यांच्याकडे आकर्षित होत असतात. फ्रिजचे पाणी अनेकांना त्रास दायक असल्यांने प्रत्येक नागरीक माठ खरेदी करीत असतो. यामुळे कुंभार समाजाला रोजगार मिळत असतो. माठाला दरवर्षी उन्हाळ्यात मागणी वाढत असते. तरी सुद्धा श्रीमंत वर्गालाही या माठाचे आकर्षण आहे. माठातील थंडगार पाणी आणि चवीमध्ये माधुर्य असते.यामुळे माठाला गरीबांचा फ्रीज म्हटले असे संबोधले जाते.

fb img 1773887073740

उन्हाळ्यात प्रत्येकाला तहान भागवायला थंड पाण्याची आवशकता भासत असते. त्यामुळे गरिबांचा चविष्ठ आणि थंड पाण्यासाठी मातीचा माठ वापरला जातो. जुन्याकाळातील फ्रीज म्हणून मातीच्या माठाला संबोधले जाते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी थंड करून घेतलेले पाणी शरीरासाठी हितकारक असल्याने ग्रामीण भागात माठाला आज ही मागणी मोठी आहे..

पारगाव (शिंगवे) आठवडे बाजारात माठ खरेदी करताना टिपलेले छायाचित्र..

(वृत्त संकलन व छायाचित्र समीर गोरडे शिंगवे पारगाव)

Related posts

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा !!

Chief Editor

बेल्हा जेजुरी राज्यमार्गावर अपघातांची मालिका सुरूच !!

Chief Editor

लोककला परंपरेतील एक तेजस्वी आणि जाज्वल्य नाव – शाहीर रामदास गुंड

Chief Editor

Leave a Comment