
पंचनामा प्रतिनिधी – माझी शाळा माझा अभिमान उपक्रमा अंतर्गत
सह्याद्री अॅग्रोव्हेट व हिंगे पाटील कृषी उद्योग आयोजित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडी स्कूल बॅग वाटप कार्यक्रम आनंदाने -उत्साहाने संपन्न झाला.
या प्रसंगी श्री.खंडूशेठ भोजने (चेअरमन जारकरवाडी विविध कार्यकारी सोसायटी )सौ.प्रतिक्षाताई बढेकर (सरपंच जारकरवाडी )
सौ.कौशल्याताई भोजने (मा. उपसरपंच जारकरवाडी )
श्री.रविंद्र काकडे (उपाध्यक्ष शरद ग्रामीण पतसंस्था ) श्री.भागाजी भांड (एरिया सेल्स मॅनेजर सह्याद्री अॅग्रोव्हेट) श्री.किरण लबडे (अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती जारकरवाडी ) सौ.दिपाली नवनाथ मंचरे (उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती जारकरवाडी ) श्री.गणेश देवडे (मा.उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती जारकरवाडी ) श्री. विशाल साबळे (विक्री प्रतिनिधी सह्याद्री अॅग्रोव्हेट) श्री.आदेश हिंगे (हिंगे पाटील कृषी उद्योग पारगाव
श्री. इनामदार सर (मुख्याध्यापक ) व सर्व शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.


सह्याद्री ऍग्रोव्हेट ह्या कंपनीने समाजाप्रती आपलं देण लागतो हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन कंपनीला जो काही नफा होतो त्यातील 25 टक्के नफा हा समाजातील उपक्रम राबविण्यासाठी वापरला जातो .त्याचप्रमाणे समाजात ज्या 10 वर्षाच्या आतील ज्या मुलीचे वडील या जगात नाही अश्या गरजू मुलींना सह्याद्री कंपनी दत्तक घेऊन त्यांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी सह्याद्री कंपनी घेते. त्याच प्रमाणे गाईचा संसार ह्या संकल्पनेतून अनेक उपक्रम राबविले जातात अशी माहिती कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर भांड साहेब यांनी दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. इनामदार सर यांनी केले व आलेल्या सर्व मान्यवरांचे श्री. उकिर्डे सरांनी आभार मानले आणि हिंगे पाटील कृषी उद्योग यांच्या माध्यमातून मुलांना खावू वाटप करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली

