सामाजिक

कौतुकास्पद….राळेगण (ता.जुन्नर) येथे संपन्न झाला माहेरवाशीनींचा मेळावा !!

img 20260405 wa0503

पंचनामा प्रतिनिधी – गावातील शाळेत शिकलेल्या त्या माहेरवासीयांनी तब्बल 40 वर्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन भेटण्याचा दिवस निश्चित केला. आणि पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या त्या महिला एकत्र येऊन जुन्या आठवणीत रमून गेल्या.

राळेगण (ता.जुन्नर) येथे माहेरवासीनीच्या मेळाव्यात शाळेचे जुने दिवस आठवून गप्पा गोष्टी रंगल्या.जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात राळेगण हे छोटसं गाव !!गावात प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या महिलांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विवाह करून सर्व महिला इतरत्र स्थायिक झालेल्या. आता त्या कुटुंबात रमल्या असून काहींना नातवंडे आले आहेत. अशातच जयश्री शेटे, पुष्पा खिल्लारी, सखुबाई खामकर, बेबी मोहरे, अलका गायकवाड ,माजी सरपंच कुसुम उंडे, अल्पना थोरवे, लता चतुर, संगीता सरजिने, सविता लांडे यांनी पुढाकार घेऊन एकत्र येण्याचे ठरवले. यातील ठराविक महिला एकमेकांच्या संपर्कात होत्या.इतरांचा शोध घेणे काहीशी अवघड गोष्ट होती.मात्र व्हाट्सअपवर माजी विद्यार्थिनींचा ग्रुप महिलांना जोडण्यात आले. मग एकत्र येण्याचे त्यांनी ठरविले.

fb img 1773887068819

ग्रामस्थांना ज्यावेळेस ही माहिती समजली त्यावेळेस त्यांनीही पुढाकार घेतला. गावातील हनुमान मंदिरात ४० वर्षानंतर या माहेरवासीनी एकत्र जमा झाल्या. आणि मग जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. विशेष म्हणजे पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तब्बल ८० महिला एकत्र जमल्या. काहींचा शालेय दिवसातील आठवणी तसेच मैत्रीचे किस्से सांगताना अश्रूचा बांध फुटला. शाळेत असताना जे खेळ खेळले जात होते त्याची पुनरावृत्ती करण्यात आली. आपापल्या कुटुंबाची माहिती देताना शिक्षकांप्रती ऋण व्यक्त करण्यात आले.

मुख्य आयोजिका जयश्री शेटे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. दिवसभर गप्पा गोष्टी सुरू होत्या.राळेगण ग्रामस्थांनी या माहेरवासीयांना स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था केली होती. सकाळी सुरू झालेला कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालला.

विघ्नहर प्रतिष्ठान राळेगण, महिला बचत गट तसेच मच्छिंद्र गायकवाड, बाळासाहेब कोंदे ,चंद्रकांत सोनवणे, निलेश उंडे, महेंद्र उंडे, नवनाथ गायकवाड, प्रशांत उंडे, चित्रसेन शिंदे, प्रभावती शिंदे, रवींद्र सोनवणे ,निलेश उंडे यांनी नियोजन केले. परत लवकरच भेटण्याचा निश्चय करून महिलांनी आपल्या माहेराचा निरोप घेतला.

fb img 1773887073740

राळेगण येथे माहेरवासीय महिलांचा मेळावा पार पडला.

(वृत्त संकलन – ॲड. विलास शेटे)

Related posts

देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील दोन अमृत रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण !!

Chief Editor

अवसरी बुद्रुक येथे भव्य कृषी मेळावा व चर्चासत्र उत्साहात संपन्न !!

Chief Editor

ग्रामपंचायत जवळे यांच्या वतीने गावातील सर्व ग्रामस्थांना मेडिक्लोरचे वाटप सुरु !!

Chief Editor

Leave a Comment