सामाजिक

तमाशा क्षेत्रातील तेजस्वी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व मंदाराणी खेडकर !!

img 20260623 wa0911

तमाशा रंगभूमीवरील तेजस्वी व्यक्तिमत्त्व, आदरणीय मंदाराणी खेडकर माऊशी यांना मानाचा मुजरा !!

आमची माऊशी, आदरणीय मंदाराणी खेडकर या केवळ तमाशातील नृत्यांगना नाहीत तर लोककलेच्या मंदिरातील एक जिवंत परंपरा आहेत. त्यांच्या कलेचा सुवास आजही असंख्य रसिकांच्या मनात दरवळत आहे.
मला आजही ते दिवस अगदी स्पष्ट आठवतात. वर्षातून पंधरा-वीस वेळा आमच्या दोन्ही तमाशा फडांचे कार्यक्रम शेजारी-शेजारी भरायचे. मध्ये फक्त एक कनात असायची, पण त्या कनातीपलीकडून येणारा माऊशींच्या कलेचा आवाज मात्र थेट मनापर्यंत पोहोचायचा.

1009923491

मी आवर्जून त्यांची लावणी पाहण्यासाठी जायचो. त्यांच्या स्वरात साकारलेली स्वरसाम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांची लावणी खेळताना बाई रंग होळीचा क्षणभर वाटायचे की स्वतः सुलोचनाताईच रंगमंचावर अवतरल्या आहेत.
त्यांची शेरोशायरी, त्यांची अदाकारी, त्यांचा आत्मविश्वास आणि रसिकांशी साधलेला जिव्हाळ्याचा संवाद हे इतके प्रभावी असायचे की ग्रामीण भागातील रसिकसुद्धा टाळ्यांचा कडकडाट केल्याशिवाय राहू शकत नसत. प्रत्येक सादरीकरणात त्यांनी आपल्या कलेचा असा ठसा उमटवला की ती आठवण आजही ताजी आहे.

विशेषतः फुलनदेवी या वगनाट्यात त्यांनी साकारलेली भूमिका तर अविस्मरणीय होती. त्यांच्या अभिनयातील ताकद, डोळ्यांतील ज्वाला आणि पात्राशी असलेली एकरूपता पाहून प्रेक्षक भारावून जात असत. त्या भूमिकेने त्यांच्या अभिनयकौशल्याला एक वेगळीच उंची मिळवून दिली.

1009923489

आज अशा महान लोककलावंताला बालगंधर्व पुरस्कार प्राप्त झाला आहे, ही संपूर्ण तमाशा विश्वासाठी अभिमानाची बाब आहे हा पुरस्कार त्यांच्या दशकानुदशकांच्या अथक परिश्रमांचा निष्ठेचा आणि लोककलेवरील प्रेमाचा सन्मान आहे.

मंदा मावशी आपण केवळ एक कलाकार नाही, तर लोककलेचा जपणारा दीपस्तंभ आहात. आपल्या कलेने हजारो रसिकांच्या हृदयात आनंद, संस्कार आणि मराठी मातीचा सुगंध जपला आहे. आपल्या कार्याला माझा मनःपूर्वक सलाम रंगमंचावर अनेक कलाकार येतात आणि जातात, पण काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की ती इतिहास बनून जातात मंदाराणी खेडकर हे त्यापैकीच एक तेजस्वी नाव आहे.

बालगंधर्व पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आपल्या कलेचा प्रवास असाच तेजस्वी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..

शब्दांकन – आपला चाहता
अनिल बनसोडे करवडीकर

1009850407

Related posts

समर्थ मध्ये सायबर गुन्हे व सुरक्षा या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन ;डिजिटल अरेस्ट म्हणजे सायबर फसवणूक- एच.डी.एफ.सी बँकचे क्लस्टर हेड रोहित तेंडुलकर यांचे प्रतिपादन

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथील विद्यार्थ्यांना सह्याद्री अ‍ॅग्रोव्हेट व हिंगे पाटील कृषी उद्योग यांच्या माध्यमातून स्कूल बॅगचे वाटप !!

Chief Editor

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे ज्वारी पिक काढणीला सुरवात !!

Chief Editor

Leave a Comment