सामाजिक

पारगाव (कारखाना) येथे म्हसोबा देवस्थानाचा वर्धापन दिन उत्साहात !!

1010445819


पारगाव (कारखाना), ता. आंबेगाव : येथील चव्हाण वस्तीवरील श्री म्हसोबा देवस्थानाचा वर्धापन दिन सलग चौथ्या वर्षी भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त पहाटे देवाची विधीवत पूजा, अभिषेक व मंत्रोच्चारात महाआरती करण्यात आली. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमास पारगावचे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य किरण शेठ ढोबळे,ग्रामपंचायत सदस्या प्रियांका ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ चव्हाण, सोसायटीचे माजी उपाध्यक्ष माणिक ढोबळे, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विवेक चव्हाण, राजेंद्र लबडे, सुहास मिंडे, राहुल साबळे, संतोष चव्हाण, गणेश चव्हाण, राजू साबळे, विक्रांत चांगण, रोहिदास ढोबळे, संतोष ढोबळे, पांडुरंग लबडे, बाळासाहेब पाचपुते, कैलास चांगण, ओम साई कृषी सेवा केंद्राचे महेंद्र ढोबळे, नितीन ढोबळे, अनिकेत गावडे, रघुनाथ चांगण, साईल साबळे, वैभव वाव्हळ, भरत चांगण, बाबाजी चव्हाण, मनोज ढोबळे, एकनाथ मेहेर, विकास लबडे, विठ्ठल तागड यांच्यासह महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धार्मिक विधीनंतर ढोबळे, चव्हाण, चांगण, मिंडे, साबळे, लबडे, गावडे व पाचपुते परिवारांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत वर्धापन दिन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

1010391286

Related posts

पंचनामा विशेष – आठवणीतील माणसे…

Chief Editor

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळ जाणवायला लागला!!

Chief Editor

राज्यात साखर उत्पादन १० लाख टनांनी घटणार; उत्पादन १०० लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता !!

Chief Editor

Leave a Comment