सामाजिक

यंत्र सरस्वतीचं…! साभार लेख- मोहन वामने

1011402478
1011402478

पंचनामा विशेष -“आबा मला पाटीवर ते सरस्वती ची रांगोळी काढून द्या ना ” तिची आज्ञा.

“म्हणजे काय काढायचं ?

“अहो आज दसरा आहे ना, मग ती रांगोळी नाय का काढीत, पहिलं एक नाहीतर चार काढून रांगोळी काढतात, ते.”

” सरस्वती यंत्र होय, बरं, असं कर तूच काढ तूझ्या हातानं, येईल तुला काढता. “

साठ वर्ष मागे गेलो.

लाकडी चौकटी मधील काळ्या रंगाची पातळ फरशी वापरून केलेली ती पाटी डोळ्यासमोर आली.

आदल्या दिवशीच “ब्लेटपान “वापरून कालपर्यंत काळपट पडलेली ती लाकडी चौकट पाणी वापरून घासून पुसून शुभ्र केल्याचे आठवलं.

चौकटीतील काळी फरशी धुवून वर्षांतून एकदाच ” 501 साबणबार “चोरून वापरून धुवून अजून चकचकित काळी केल्याचे आठवलं.

त्यांच चकचकित पाटीवर, पाच वेळा मराठीतून काहीसा तिरका एक लिहून, त्याच्या पाया कडून सुरवातीला काहीशी तिरकी पण छोटी रेष मारून त्या खालीच आडवी ओढत नेऊन शेवटच्या एका जवळ वरती “रफार टाईप पोहचवून बाकी सर्व एक चं असं डेकोरेशन केल्याचे आठवलं.

रोज शाळेत घेऊन जातं असलेल्या कापडी पिशवीतील दप्तरं आठवलं.

दप्तरातील उपलब्ध असलेल्या, “वह्या पुस्तकं “, ” टाकदौत “, शिसपेन्सिल “खुल्डबर “”, बोरु “
आणि शाई कागदावर फुटू नये म्हणून शाईने लिहिलेल्या अक्षरावर टाकलेली, “माती “आठवली.

दसऱ्याच्या दिवशी हे सर्व शालेय साहित्य एका ओळीत ठेऊन, हळदी कुंकू आणि झेंडू ची फुल किंवा फुलांच्या पाकळ्या टाकून केलेले,”सरस्वती पूजन “केल्याचे आठवलं.

” खोबऱ्याच्या तुकड्यावर, गुळाचा खडा “ठेऊन सरस्वती मातेला दाखवलेला ” नैवध्य “आठवला.

संध्याकाळी पूजा विसर्जन केल्यावर, गुळाला लागलेल्या मुंग्या झटकून फस्त केलेलं ते ” गूळ खोबरं “आठवलं.

आज हिला पाहतोय किती किती प्रकारच्या सरस्वती चं पूजन करावं लागतंय यांना,?

आपल्या दप्तराबाहेर सरस्वतीची कुठं वस्तीच नसावी असा समज असावा आपला.

आता किती विस्तार झालाय सरस्वतीचा, होत्या तेव्हाही होत्याच की हे सर्व “कला कौशल्य “.
प्रत्येक जन आपापल्या व्यवसाय नुसार पूजा करीत असतं, आपलं वय तेव्हा शाळेपल्याड नव्हतच म्हणून आपल्या मनातील सरस्वती आपल्या दप्तरं पुरतीच मर्यादित होती.

आता विध्यार्थी दशेत,सरस्वती चा खूप मोठा विस्तार झालाय. 52 कला पैकी थोड्या तरी कला आपल्या पाल्या मध्ये असाव्यात अशी धारणा प्रत्येक पालकांची झालेली आहे.

मिळणाऱ्या आणि आत्मसात केलेल्या कला गुणा पैकीच एखादी कला आपलं भविष्य घडवणार आहे म्हणून सरस्वतीचा इतका विस्तार झालेला आहे.

तिच्या शाळेतल्या इतक्या जड दप्तर पासून, तिचा पियानो, हर्मोनियम, रंगाचे ब्रश पर्यंत.
तिला जिथं जिथं सरस्वती चं दर्शन घडेल त्या सर्व साधन सामग्रीची पूजा आज ती करणारं.

संस्कृती टिकवून राहणं महत्वाचं.
भविष्यात कोणत्या वस्तुतील सरस्वती जीवनाचा आधार होईल हे सांगता येत नाही

पण आपल्याला सर्व क्षेत्रात ज्ञान अस्सव, ही जिज्ञासा च त्यांच जीवन घडवणार आहे हे नक्की.

साभार लेख- मोहन वामने

1011339319

Related posts

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे श्री शंभू महादेवाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात संपन्न !!

Chief Editor

जांभोरी येथे पारंपरिक पद्धतीने बैलपोळा सण उत्साहात साजरा ; ढोल-ताशा आणि बँजोच्या तालावर बैलांची मिरवणूक !!

Chief Editor

लोककला परंपरेतील एक तेजस्वी आणि जाज्वल्य नाव – शाहीर रामदास गुंड

Chief Editor

Leave a Comment