सामाजिक

जारकरवाडीत पारंपरिक पद्धतीने दसरा उत्साहात ; बिरोबा मंदिरात दहा दिवसांचा कीर्तन महोत्सव; बारा गाड्या ओढण्यासह गजी नृत्याने रंगला दसरा सोहळा !!

1011400668
1011400776

पंचनामा प्रतिनिधी जारकरवाडी – आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे शेकडो वर्षांची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपत दसरा सण मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. बिरोबा महाराज यांच्या मंदिरात दहा दिवसांच्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरांसोबतच सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्यात आला.

1011400767
1011400751

दसऱ्याच्या दिवशी सकाळी गंगेचे पवित्र पाणी आणून बिरोबा महाराजांना अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवाला हळद लावण्याचा धार्मिक विधी पार पडला. डफाच्या तालावर पारंपरिक गजी नृत्य सादर करण्यात आले. वाजतगाजत बिरोबा महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी देवाचे भक्त गणबाबा मंचरे बारा गाड्या लिलया ओढतात. हा पारंपरिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडला. या सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

1011400744

दसऱ्याच्या निमित्ताने बिरोबा मंदिरात वार्षिक भाकणूक सांगण्यात आली.आगामी वर्षातील पीक-पाणी, पर्जन्यमान, हवामान व वातावरणाची स्थिती, शेतीमालाला मिळणारा बाजारभाव तसेच शेतकऱ्यांसाठी वर्ष कसे राहील, याबाबत पारंपरिक पद्धतीने भाकणूक करण्यात आली. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये या भाकणुकीबाबत विशेष उत्सुकता होती.

1011400730

जारकरवाडीला धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे. गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रभू रामचंद्र व सीतामाई यांनी वास्तव्य केल्याच्या खुणा असल्याची ग्रामस्थांची श्रद्धा आहे. प्रभू रामचंद्रांनी येथे शिवलिंगाची स्थापना केली असल्याचीही आख्यायिका सांगितली जाते. तसेच गाव परिसरात अजिंठा-वेरूळच्या लेण्यांची आठवण करून देणारे कोरीव काम आढळून येते. पांडुरंग मंदिरासमोरील स्मशानभूमीजवळ अर्धवट अवस्थेतील उत्खननाचे अवशेषही आढळतात. या धार्मिक व ऐतिहासिक ठेव्यामुळे गावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

1011400713
1011400708

दहा दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात भाविकांसाठी अखंड अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. दसऱ्याच्या सायंकाळी महिला भगिनींसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम घेण्यात आला. धार्मिक कार्यक्रमांसोबतच मनोरंजन आणि सामाजिक एकोप्याला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम राबविण्यात आले.

1011400701

या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन बिरोबा महाराज नवरात्र उत्सव समिती,गावातील तरुण सहकाऱ्यांनी केले. ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि सहकार्याने धार्मिक विधी, मिरवणूक, गजी नृत्य, बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम तसेच अन्य उपक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. डफाच्या तालावर गजी नृत्य सादर करताना गावातील सर्व समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

1011400694

जारकरवाडी हे आंबेगाव तालुक्यातील प्रगतशील गाव म्हणूनही ओळखले जाते. डिंबे धरणाच्या पाण्यामुळे गावात बारमाही बागायती शेती उपलब्ध असून विविध नगदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. शेती, धार्मिक परंपरा आणि सामाजिक सलोखा यांचा सुंदर मिलाफ गावाच्या जीवनशैलीत पाहायला मिळतो. ग्रामस्थ गुण्यागोविंदाने राहत असून धार्मिक व सांस्कृतिक परंपरा पुढील पिढीकडे जपण्याचे काम सातत्याने केले जात आहे.

1011400685
1011400481
1011400470
1011400452

बिरोबा महाराज हे जागृत देवस्थान असल्याची ग्रामस्थांची श्रद्धा असून, वर्षानुवर्षे सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने जपली जात आहे. दसरा सोहळ्याच्या निमित्ताने जारकरवाडीच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन यंदाही घडले.

img 20261016 wa1042

Related posts

प्रसंगावधान आणि वैद्यकीय कौशल्यातून १८ वर्षीय तरुणाला जीवनदान; डॉ. धनंजय साबळे यांच्या कार्याचे कौतुक !!

Chief Editor

मांदळेवाडी येथे बिबटयाचा वावर वाढला ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण !!

Chief Editor

शिरदाळे – आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात प्रगत असूनही गावचे गावपण जपणारे गाव !!

Chief Editor

Leave a Comment