सामाजिक

समर्थ शैक्षणिक संकुलात शारदीय नवरात्रोत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा ; प्रबोधनपर व्याख्याने, विविध स्पर्धा, दांडिया, गरबा, भोंडला आणि खंडेनवमी निमित्त यंत्रपूजनाचे आयोजन !!

img 20261020 wa0946
1011396966



पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल, बेल्हे येथे ‘उत्सव विचारांचा, जागर स्त्रीशक्तीचा’ या संकल्पनेअंतर्गत शारदीय नवरात्रोत्सव विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये स्त्रीशक्तीचा सन्मान, आरोग्यविषयक जागरूकता, सामाजिक भान, सायबर सुरक्षेचे महत्त्व आणि भारतीय संस्कृतीतील परंपरांविषयी आदरभाव निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
नवरात्रोत्सवानिमित्त संकुलात विविध विषयांवरील प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये अंजली पारगावकर यांनी ‘योगा आणि मनःशांती’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. नीलम गायकवाड यांनी ‘शारीरिक आणि मानसिक आरोग्य’ या विषयातून निरोगी जीवनशैलीचे महत्त्व स्पष्ट केले. मृणाल डहाळे यांनी ‘सायबर सुरक्षा’ या विषयावर मार्गदर्शन करताना डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर आणि ऑनलाइन व्यवहारांबाबत जागरूक राहण्याची आवश्यकता अधोरेखित केली. सुवर्णा मुळे यांनी ‘ध्यान व सुदर्शन क्रिया’ या विषयावर मार्गदर्शन करून मानसिक संतुलन आणि मनःशांतीसाठी ध्यानाचे महत्त्व विशद केले. या व्याख्यानांमुळे विद्यार्थिनींना आरोग्य, सुरक्षितता आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने उपयुक्त माहिती मिळाली.
उत्सवाच्या कालावधीत विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी थाळी सजावट,पत्रलेखन, सामान्य ज्ञान, रांगोळी आणि पोस्टर मेकिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या सर्जनशीलतेचे, कल्पकतेचे आणि अभिव्यक्ती कौशल्याचे दर्शन घडविले. या स्पर्धांमधील विजेत्यांचा प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
थाळी सजावट स्पर्धेत समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या किरण शेंडगे यांनी प्रथम, समीक्षा ढमाले यांनी द्वितीय, तर समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीच्या पायल यादव यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
पत्रलेखन स्पर्धेत समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या किरण शेंडगे यांनी प्रथम, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या ईश्वरी राऊत यांनी द्वितीय, तर समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या तयाबा पटेल यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
सामान्य ज्ञान स्पर्धेत समर्थ पॉलिटेक्निकच्या अनुष्का बोरुडे यांनी प्रथम, पूनम बांगर यांनी द्वितीय, तर समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या आकांक्षा राजदेव यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
रांगोळी स्पर्धेत ऋतुजा भांबेरे आणि पूर्वा चौगुले यांनी प्रथम, तनुजा रसाळ आणि सिद्धी पोटघन यांनी द्वितीय, तर अस्मिता उचाळे आणि सिमरन पटेल यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
पोस्टर मेकिंग स्पर्धेत पूर्वा शेळके यांनी प्रथम, ऋतुजा भांबेरे यांनी द्वितीय, तर तनिष्का डुंबरे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
या सर्व स्पर्धांतील विजेत्यांना प्रा.शितल ठुसे, समर्थ शैक्षणिक संकुलाच्या संचालिका तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. स्नेहलताई शेळके आणि समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
समर्थ गुरुकुल येथे दांडिया, गरबा आणि भोंडल्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह महिला शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेत विविध सांस्कृतिक सादरीकरणे केली. पारंपरिक वेशभूषा, संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला. भोंडल्याच्या पारंपरिक गीतांमुळे उत्सवाला सांस्कृतिक रंगत प्राप्त झाली.या उपक्रमांमधून भारतीय संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्याबरोबरच विद्यार्थिनींमध्ये सांघिक भावना, परस्पर सहकार्य आणि सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत झाली.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने समर्थ शैक्षणिक संकुलात खंडेनवमीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, डॉ. लक्ष्मण घोलप प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत समर्थ आयटीआय विभाग तसेच समर्थ पॉलिटेक्निकच्या कार्यशाळेत यंत्रपूजन करण्यात आले. पारंपरिक पद्धतीने पूजन करून ज्ञान, कौशल्य, श्रम आणि कार्यसाधनेसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या उपक्रमातून भारतीय संस्कृतीतील परंपरा आणि आधुनिक तांत्रिक शिक्षण यांचा सुंदर समन्वय साधण्यात आला.

img 20261016 wa1042

Related posts

पंचनामा विशेष – साने गुरुजी

Chief Editor

समर्थ गुरुकुलचा (CBSE) दहावीचा १००% निकाल !!

Chief Editor

राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृतीसमर्थ फार्मसीसह पाच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा सहभाग; पथनाट्यांतून प्रभावी संदेश

Chief Editor

Leave a Comment