सामाजिक

मा.पंचायत समिती सदस्य श्री.रवींद्र बाळासाहेब करंजखेले यांच्या कार्याचा आलेख मांडत शिरदाळे गावाचे मा.उपसरपंच,प्रसिद्ध निवेदक मयुर सरडे यांनी अभिनव पद्धतीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

img 20260404 wa0531

पंचनामा विशेष – ४ एप्रिल १९८० साली आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील धामणी गावातील एका शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेले व्यक्तिमत्व म्हणजेच श्री.रवींद्र करंजखेले !!

धामणी हा पहिल्यापासून दुष्काळी भाग !! करंजखेले कुटुंब हे एक शेती करणारे सर्वसामान्य कुटुंब तर रविभाऊंचे वडील श्री.बाळासाहेब यांचा धामणी गावात किराणा दुकानाचा व्यवसाय…बाकीचे तीन चुलते कोणी शिक्षक तर कोणी तलाठी अशा हुद्यावर होते.पण बाळासाहेब हे गावाला राहून शेतीचा भार सांभाळत असत.

शालेय जीवनापासूनच वक्तृत्वाची आवड असल्याने रविभाऊ अर्थात सर्वांचा पिंट्या हा भाषणांमध्ये चुणूक दाखवत होता.शाळेत जेमतेम असणारा हा मुलगा बोलण्यात सुरवातीपासूनच पटाइत होता.बोलण्याची आवड असल्याने आणि खटपटी स्वभाव असल्याने तो शांत बसून देत नव्हता.मग काय कमी वयातच म्हणजे वयाच्या १७,१८ व्या वर्षी गावचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.बोलण्यात पटाईत आणि हुशार तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ हा त्यांचा राजकारण आणि समाजकारणाचा मूलमंत्र आजही कायम आहे.

शिवसेना,हिंदुत्ववादी विचार या सगळ्यामधून तयार झालेलं नेतृत्व स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असणारी प्रचंड निष्ठा यामुळे शिवसेना या संघटनेशी झालेली एकरूपता !!! त्यात खासदार श्री.शिवाजीरावदादा आढळराव पाटील यांच्यासारखे मिळालेले नेतृत्व यामुळे रवी करंजखेले अर्थात सर्वांचा लाडका पिंट्या शिवसेना या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदापर्यंत जाऊन पोहचला होता.

fb img 1773887068819

राजकीय प्रगती साधताना या माणसाने वयक्तिक कौटुंबिक प्रगती मागे पडून दिली नाही.सुरवातीला विट निर्मिती कारखाना त्यात आलेले यश त्यानंतर उभा केलेला कुकुटपालन अर्थात पोलेट्री व्यवसाय यातून व्यावसायिक क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली आहे.यासाठी त्यांना कुटुंबाची मिळालेली साथ देखील तितकीच लाख मोलाची होती.

आज तालुक्यातील पहिल्या तीन क्रमांकाच्या पोलेट्री व्यवसाईकांमध्ये त्यांचा समावेश आहे.जीवनात देखील अनेक चढउतार सहन केलेले हे व्यक्तिमत्व आज मात्र त्यावर मात करून मोठ्या जिद्दीने उभे आहे.राजकारणात आपला पाय रोवत असताना २०१७ साली शिवसेना पक्षाने त्यांना पंचायत समितीचे उमेदवारी दिली.यात देखील त्यांनी बाजी मारली आणि विरोधी पक्षाचा सदस्य म्हणून चोख जबाबदारी पार पाडली. यातून त्यांना खूप मोठा प्रशासकीय अनुभव मिळाला.ज्याचा आजही त्यांना उपयोग होत आहे.

राजकारणात अनेक स्तित्यांतरे बदलत असतात.त्याच प्रमाणे त्यांनी २०२३-२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी श्री.शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.ज्या ठिकाणी जाईल त्यांचे काम प्रामाणिक करायचे त्यांच्याशी गद्दारी करायची नाही.हा त्यांचा मूलमंत्र त्यांच्या प्रगतीचा आलेख उंच करण्यात महत्वाची भूमिका बजावत आला आहे.ज्यावेळी शिवसेना फुटली त्यावेळी त्यांना खूप मोठी संधी होती परंतु ज्या नेत्याने आपल्याला मोठं केलं त्या दादांची साथ त्यांनी सोडली नाही.याचा खूप मोठा तोटा त्यांना गावपातळीवर झाला.अनेक जिवाभावाचे सहकारी राजकीय दृष्ट्या बाजूला गेले.लोकसभेनंतर लगेचच विधानसभा निवडणूक पार पडली.त्यात देखील त्यांनी संबंध तालुक्यात जोमाने प्रचार केला.यातून त्यांची मा.ना.दिलीपराव वळसे पाटील यांच्याशी अधिक जवळीक वाढली.रवी हा एकदम परखड कार्यकर्ता आहे असे साहेबांचे कायम मत असते.याच माध्यमातून रविभाऊंनी मा.ना.दिलीपराव वळसे पाटील,सौ.किरणताई वळसे पाटील यांचा देखील विश्वास संपादन केला.साहेबांनी त्यांना तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली.त्यानंतर जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पक्षाने त्यांच्यावर दिलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली.

रवी करंजखेले म्हणजे विरोधी पक्षाचे व्यक्तिमत्व म्हणून आम्हाला त्यांची ओळख !! आम्ही देखील साहेबांचे खंदे समर्थक असल्याने साहेबांचा विरोधक तो आपला विरोधक याप्रमाणे त्यांची आम्हाला विरोधक म्हणूनच ओळख होती.आजही मला २०१७ च्या निवडणूकीत अवसरी या ठिकाणी पक्षाने भाषण करण्याची संधी दिली होती.त्यावेळी त्यांच्यावर शाब्दिक टीका देखील माझ्याकडून झाली होती.परंतु त्यानंतर मला भेटल्यावर कायम आपुलकीने दोन शब्द बोलून स्नेह जपण्याचे काम त्यांनी केले.व्यवसायासाठी धामणीमध्ये असल्यामुळे आमची देखील गेल्या चार पाच वर्षात जवळीक वाढत गेली.राजकीय विरोध होता पण प्रेमाचे दोन शब्द कायम असायचे.नंतरच्या काळात ते राष्ट्रवादी मध्ये आले आणि वैचारिक विरोध देखील मावळला.आज एक जेष्ठ सहकारी म्हणून मार्गदर्शक म्हणून कायम संपर्कात असतात.

आज त्यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक आक्रमक चेहरा मिळालेला आहे. ते देखील पक्षाला अधिकचा वेळ देण्याचा प्रयत्न करत आहेत.एक संघटनेत तयार झालेला सर्वसामान्य कार्यकर्ता किती उंचीवर जाऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री.रवींद्र बाळासाहेब करंजखेले हे आहेत.आज आपला वाढदिवस आपल्याला शुभेच्छा देत असताना आपल्या हातून गाव,देश,समाज आणि कुटुंब यांची सेवा घडो आपल्याला उदंड आयुष्य लाभो याच कुलस्वामी खंडेराया चरणी प्रार्थना…🎂💐❤️

शब्दरचना:- श्री.मयुर संभाजी सरडे (निवेदक,मा.उपसरपंच शिरदाळे)

Related posts

अन् अजितदादा पवार तमाशा कलावंत शांताबाई ला नम्रपणे नमस्कार करतात !!

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक गावातील तरुणांनी जपली ७० वर्षांची नाट्य परंपरा!!

Chief Editor

टी.व्ही.एस कंपनीच्या वतीने खडकवाडी येथे ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा !!

Chief Editor

Leave a Comment