सामाजिक

श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९९२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न !!

1009767423

पंचनामा प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेचे श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक तांत्रिक विद्यालय, अवसरी खुर्द एस.एस.सी. बॅच १९९२ चा स्नेहमेळावा दिनांक ७/६/२०२६ रोजी सिल्क रूट रिसॉर्ट एकलहरे येथे सर्व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

तब्बल ३४ वर्षांनंतर अनेक मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कार्यक्रमात सर्वांनी आपापल्या शालेय जीवनातील अनुभव आणि आठवणीना उजाळा दिला.

उपस्थितांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विविध मनोरंजनात्मक उपक्रम आणि संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

सहकाऱ्यांमधील मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. दूरवरून आलेल्या माजी विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

1009767422

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाळासाहेब आरुडे यांनी खूप छान पद्धतीने केले. आयोजन आणि नियोजन श्री मछिंद्र गावडे श्री मछिंद्र भोर, श्री राहुल अभंग, श्री अनिल गावडे सर, श्री नितीनकुमार नरवडे यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केले.

सर्व उपस्थितांनी आयोजकांचे विशेष आभार मानले. विद्यालयाचे माजी शिक्षक श्री ज्ञानेश्वर शेटे सर यांची उपस्थिती लाभली. त्यांनी स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष पद स्वीकारून मार्गदर्शन केले.

माजी विद्यार्थी सौ सुजाता घोलप, सौ मीरा शेटे, सौ सीमा घुले, श्री शिवदास भोर, श्री योगेश कराळे, श्री नितीन खेडकर, श्री सचिन भोर, श्री विकास टेमकर, श्री हेमंत शिंदे , श्री राजेंद्र आरूडे, श्री संतोष भोर व जवळपास ५० माजी विद्यार्थ्यांनी स्नेह, आनंद आणि आठवणींनी भरलेला हा स्नेहमेळावा अविस्मरणीय ठरवला.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 353521
1009760330
1009760330

Related posts

जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक सौदागर घुमट !!

Chief Editor

डिंभे धरणाचा उजवा कालवा पाणी नव्हे तर प्लॅस्टिक वस्तू वाहण्याचे उत्तम साधन !!

Chief Editor

जीवन प्रवासात “भाग्य” हे लिप्ट सारख आहे तर “मेहनत” ही शीडी सारखी आहे..!!

Chief Editor

Leave a Comment