सामाजिक

शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करीत भारतीय नौदलातील कॅप्टन तन्मय अशोक सैद पाटील यांचे शाळेला क्रीडा साहित्यासाठी ५० हजारांचे सौजन्य !!

img 20261031 wa0485
1011528502

पंचनामा प्रतिनिधी – शालेय जीवनात मिळालेल्या संस्कारांची आणि शाळेने दिलेल्या शिक्षणाची जाणीव ठेवत श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक (विज्ञान) विद्यालय, शिंगवे पारगाव (ता. आंबेगाव) येथील २००७-२००८ च्या माजी विद्यार्थ्याने शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त करत ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. भारतीय नौदलात कार्यरत असलेले कॅप्टन तन्मय अशोक सैद पाटील यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी ही देणगी दिली असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कॅप्टन तन्मय अशोक सैद पाटील हे सध्या भारतीय नौदलात उत्तर आफ्रिकेतील लिबिया येथे क्रूझ कॅप्टन पदावर कार्यरत आहेत. शालेय जीवनापासूनच त्यांना खेळाची विशेष आवड होती. विद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी वैयक्तिक क्रीडा स्पर्धांमध्ये विभागीय स्तरावर शाळेचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे खेळाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात मिळणाऱ्या संधींची त्यांना जाणीव आहे.

आज श्री भैरवनाथ विद्यालयातील विद्यार्थी कुस्ती, कराटे, ॲथलेटिक्स, खो-खो आणि कबड्डी या क्रीडा प्रकारांत तालुका, जिल्हा तसेच विभागीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत आहेत. विद्यालयाच्या या क्रीडा प्रगतीचा मनस्वी आनंद बाळगत कॅप्टन तन्मय सैद पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांना आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, या उदात्त हेतूने विद्यालयास ५० हजार रुपयांची रोख देणगी दिली.

माजी विद्यार्थ्याने आपल्या शाळेप्रति जपलेली आत्मीयता आणि क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घेतलेला पुढाकार हा इतर माजी विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. शाळेतून मिळालेल्या ज्ञानाची आणि संस्कारांची परतफेड सामाजिक बांधिलकीतून कशी करता येते, याचे उत्तम उदाहरण कॅप्टन तन्मय सैद पाटील यांनी घालून दिले आहे.

या उपक्रमाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य डी. एन. खाडे, क्रीडा शिक्षक तानाजी फुलमाळी, प्रा. शिवदत्त जोरी, संस्थेचे पदाधिकारी, शालेय समितीचे पदाधिकारी, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी विशेष कौतुक व आनंद व्यक्त केला.

माजी विद्यार्थ्याच्या या मदतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात नवी प्रेरणा मिळणार असून, विद्यालयाच्या क्रीडा प्रगतीला आणखी बळ मिळणार आहे.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 399503

Related posts

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात पारंपरिक पद्धतीने साजरी झाली वटपौर्णिमा !!

Chief Editor

आंबेगाव तालुक्याच्या शिरपेचात मनाचा तुरा; शेतकरी कुटुंबातील चार पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण पुर्ण करून पोलीस सेवेत दाखल !!

Chief Editor

घरमालकांनी भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला सादर करण्याबाबत अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश जारी !!

Chief Editor

Leave a Comment