सामाजिक

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात विशेष वाहतूक व्यवस्था; दर्शनासाठी १० ठिकाणी वाहनतळाची सुविधा !!

1010095399

पंचनामा प्रतिनिधी – संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा दिनांक ९ ते १० जुलै २०२६ या कालावधीत पुणे शहरात संयुक्त मुक्काम असल्याने दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच वाहतूक सुरक्षित, सुरळीत आणि नियोजनबद्ध राहावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचा वापर करून पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी पालखी मार्ग व परिसरातील वाहतुकीत आवश्यकतेनुसार तात्पुरते बदल लागू केले आहेत. अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका, पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारी वाहने तसेच लग्नसमारंभाची वाहने यांसारख्या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.

समर्थ वाहतूक विभागाच्या हद्दीत दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी खालील ठिकाणी विशेष पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

टिळक आयुर्वेद महाविद्यालय रास्ता पेठ, ऑर्नेलास हायस्कूल कॉटर गेट चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य, कला महाविद्यालय नाना पेठ, लक्ष्मी मार्केट, नाना पेठ (नेहरू रोड), स. गो. बर्वे प्राथमिक विद्यालय रास्ता पेठ, रफी अहमद किडवाई हायस्कूल भवानी पेठ, शांताबाई लडकत प्राथमिक विद्यालय नाना पेठ, स. गो. बर्वे शाळा रास्ता पेठ, मार्कंडेय विद्यालय नाना पेठ, सावित्रीबाई फुले शाळा भवानी पेठ.

पुणे शहर वाहतूक शाखेने भाविकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून केवळ अधिकृत वाहनतळाचाच वापर करावा, असे आवाहन केले आहे.अधिक माहितीसाठी वाहतूक मुख्य नियंत्रण कक्ष येथे ७२६६८५००० किंवा ०२०-२६६८४००० या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

1009850407

Related posts

पारगाव (कारखाना) येथील खंडोबा मंदिरात श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा निमित्त गुरुचरित्र पारायणाची सांगता !!

Chief Editor

जिल्हा परिषद शिंगवे शाळेला A+ श्रेणी मानांकित !!

Chief Editor

पीएमआरडीए’ची संकटमोचक टीम; शेकडो नागरिकांचे जीव वाचविण्यात यश…!!

Chief Editor

Leave a Comment