सामाजिक

पारगाव (शिंगवे) येथील अंगणवाडीतील बालकांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप !!

1010566854

पंचनामा प्रतिनिधी – पारगाव-भीमाशंकर सहकारी साखर कारखाना परिसरातील अंगणवाडी केंद्रांमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बालकांना स्कूल बॅग व गणवेशाचे वाटप करण्यात आले.

पारगाव गावठाण, ढोबळे मळा, चिचगाई मळा, लबडे मळा, दातखिळे मळा तसेच कारखाना येथील अंगणवाडी केंद्रातील सर्व बालकांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजणे यांनी १५वा वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती दिली.

कार्यक्रमास पारगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते नितीन ढोबळे, अंगणवाडी सेविका आशा घोडेकर, मदतनीस कुंदा वायाळ तसेच माता-पालक वर्ग उपस्थित होता.
बालकांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने राबविलेल्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांनी स्वागत केले.

1010560300
1010457105

Related posts

ग्रामीण विकास केंद्र, जामखेडतर्फे लोककलावंत महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न !!

Chief Editor

तंबूतल्या तमाशाला डिजिटल रूप देणारा निस्वार्थी अवलिया – अनिल रामचंद्र बनसोडे

Chief Editor

आंबेगावच्या पूर्व भागात पारंपरिक पद्धतीने गणरायाचे आगमन !!

Chief Editor

Leave a Comment