सामाजिक

धामणी (लोणी ) येथे रंगला विठ्ठल नामाचा जयघोष !!

img 20260718 wa0685

पंचनामा प्रतिनिधी – धामणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्या विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात पडला.

यावेळी विद्यार्थ्यांनी वारकऱ्याची वेशभूषा परिधान करून पालखी सोहळा काढला होता.विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा जप करत उत्साहात यामध्ये सहभाग घेतला.या आगळ्यावेगळ्या उपक्रमात विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी सहभाग घेतला.पालखी सोहळ्याच्या अग्रभागी असलेल्या विठ्ठल रुक्मिणी ,संत तुकाराम महाराज वासुदेव , श्रीराम सीता मैया वेशभूषा केलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

1010228702

या पालखीने बाजारपेठेतून प्रदक्षिणा घालत शेवटी सावता माळी मंदिरात अभंग व भजन म्हणत साबुदाणा खिचडी आणि लाडू महाप्रसाद वाटप करुण दिंडीची सांगता केली.

त्यावेळी त्यावेळी मा. पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव जाधव , सरपंच प्रतीक्षा जाधव, उपसरपंच अक्षय विधाटे , मा.सरपंच सागर जाधव, रेश्मा बोऱ्हाडे, मा.उपसरपंच दत्तात्रय गवंडी, आकाश जाधव , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश रोडे, सदस्य सुहास, रोडे दिपाली, गायत्री भगत, माधवी विधाटे , खुशाल जाधव , गणेश जाधव, भानुदास जाधव, गुलाब गाढवे, मच्छिंद्र अमाप , बाजीराव भुमकर, रोहित भूमकर , मदन भूमकर ,तुषार भूमकर , दशरथ विधाटे , दिनेश जाधव, बाबुराव सोनवणे , भाऊसाहेब करंडे , पोपट गवंडी , हरिचंद्र गवंडी , दिलीप आळेकर , मुख्याध्यापक थोरात सर ,काळे मॅडम , केदारी मॅडम , थोरात मॅडम , जाधव मॅडम ,पोखरकर सर आदी ग्रामस्थ उपस्थित होते .

1009850407

Related posts

न्यू इंग्लिश स्कूल लाखणगावच्या १३ विद्यार्थिनींना सायकलचे वाटप !!

Chief Editor

काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील वनविभागातील अतिक्रमणे हटवली !!

Chief Editor

संत निरंकारी मिशन मार्फत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापक स्वच्छता अभियान…

Chief Editor

Leave a Comment