सामाजिक

कु. मयुरी शरद खाडे हिचे विज्ञान शाखेत घवघवीत यश

1010227856

पंचनामा प्रतिनिधी वाघोली : भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वाघोली येथील इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी कु. मयुरी शरद खाडे हिने बारावीच्या परीक्षेत ९२% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. विशेष म्हणजे, तिने बी.जे.एस. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वाघोलीच्या आतापर्यंतच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळविण्याचा मान प्राप्त केला आहे.

कु. मयुरी शरद खाडे हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार व सन्मान करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य श्री. संतोष भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉ. संजय पठारे यांच्या हस्ते कु. मयुरीचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व शुभेच्छा देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी संस्थेचे मान्यवर, प्रकल्प अधिकारी डॉ. संजय पठारे, विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवरांनी कु. मयुरीच्या यशाचे कौतुक करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कु. मयुरीने आपल्या यशाचे श्रेय पालक, प्राचार्य, शिक्षकांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण अभ्यास व मेहनतीला दिले. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाचा नावलौकिक वाढला असून, तिचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. तिचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे.

1009850407

Related posts

सौ.गायत्री नचिकेत अवधानी ( राजगुरव ) यांची “मानद वन्यजीव रक्षक ” या पदी नियुक्ती !!

Chief Editor

३० जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवा; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर पोलिस आणि परिवहन अधिकाऱ्यांकडून कडक कारवाई !!

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी येथील माध्यमिक विद्यालयाला “मोरडे फूड प्रॉडक्ट्सचे” संस्थापक मा. श्री. हर्षल मोरडे यांच्या वतीने पाच संगणक संच उपलब्ध !!

Chief Editor

Leave a Comment