सामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे बालचमूंचा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न !!

1010226862
1010226888

पंचनामा प्रतिनिधी – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे पारंपरिक दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.

1010226867
1010226865

यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वारकऱ्यांची आकर्षक वेशभूषा परिधान करून हातात टाळ, गळ्यात मृदुंग आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठ्ठल नामाचा गजर करत दिंडीत सहभाग नोंदविला. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

1010226863
1010226862
1010226856

या दिंडी सोहळ्यास शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरेचे संस्कार रुजावेत, संत परंपरेची ओळख व्हावी आणि भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

1010226828

या उपक्रमाचे नियोजन व आयोजन मुख्याध्यापक अशोक हिंगे, सहशिक्षिका हिंगे मॅडम, अंगणवाडी सेविका लताश्री लबडे आणि निर्मला पाचपुते यांनी केले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे मुलांमध्ये संस्कार, शिस्त आणि सामाजिक जाणीव विकसित होत असल्याचे मत व्यक्त केले.

Related posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडी येथे सह्याद्री अ‍ॅग्रोव्हेट व हिंगे पाटील कृषी उद्योग यांच्या माध्यमातून स्कूल बॅग वाटप !!

Chief Editor

पोलीस पाटील यांची पत्रकाराला कायमचा बंदोबस्त करण्याची धमकी,गुन्हा दाखल;अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार !!

Chief Editor

प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे येथे वृक्षारोपण संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment