सामाजिक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळुंजनगर येथे उत्साहात संपन्न झाला बालचमुचा दिंडी सोहळा !!

img 20260718 wa0542
1010226431

पंचनामा प्रतिनिधी – वाळूंजनगर (ता.आंबेगाव ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या मूलांनी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी परंपरेचा वारसा जपणारा अनोखा पालखी सोहळा उत्साहत व आनंदी वातावरणात पार पडला. विठ्ठल-रुक्मिणी आणि संतांच्या वेशभूषातील मुलांच्या सहभागाने आणि विठ्ठलाच्या गजराने संपूर्ण वाळूंजनगर व शाळा परिसर भक्तिमय झाला होता.

या उपक्रमात बाल वारकर्यांनी टाळ-मृदुंगाच्या साथीत आणि भगव्या पताक्यांसह दिंडी काढली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितिचे पदाधिकारी व ग्रामस्थ,भजन मंडळ यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्तीवर आधारित ठेका धरला होता.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, निवृत्ती, सोपान, मुक्ताई यांच्या वेशभूषा करून वारीच्या दिंडीचे महत्त्व सांगितले. यासंपूर्ण दिंडी सोहळ्याचे नियोजन अनिल गावडे व ज्योती आवटे यांनी केले होते.या दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांबरोबर ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या दिंडी सोहळ्याचे परिसरात मात्र कौतूक होत आहे.

वाळूंजनगर ( ता.आंबेगाव ) येथे आयोजीत पालखी सोहळ्यात सहभागी विठ्ठल-रुक्मिणी आणि संतांच्या वेशभूषेतील चिमुकले.

1009850407

Related posts

पद्मश्री मा.रघुवीर खेडकर यांच्या तमाशा रंगमंचावरील पहिल्या एन्ट्रीचा किस्सा !!

Chief Editor

रानमळा (ता.आंबेगाव) येथे पिंजरा लावला; मात्र दरवाजा बंदच ; बिबट्याचा वावर कायम !!

Chief Editor

आपली “सावली” बनून तो प्रत्येक वेदना सहन करत असतो, “बाप” तर फक्त आपल्या मुलांसाठी जगत असतो..!!”

Chief Editor

Leave a Comment