सामाजिक

कृषिरत्न डॉ.पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्काराने लोणी (ता.आंबेगाव) येथील ज्येष्ठ शेतिनिष्ठ शेतकरी गनिभाई हुसेन सय्यद सन्मानित!!

img 20251230 wa0360
img 20251230 wa0360

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – जय किसान फार्मर्स फोरम,गोदावरी बायो फर्टी.इंडस्ट्रिज व आमची माती आमची माणसं यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या भारताचे पहिले कृषिमंत्री कृषिरत्न डॉ.पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्काराने लोणी (ता.आंबेगाव ) येथील ज्येष्ठ शेतिनिष्ठ शेतकरी गनिभाई हुसेन सय्यद यांना नाशिक येथे आमदार राहुल टिकले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

नाशिक येथे संपन्न झालेल्या सदर कार्यक्रमास पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर,ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. जयराम पुरकर ,मल्टिमोल मायक्रो फर्टिलायझर इंडस्ट्रिजचे शशिकांत शेट्टी,राष्ट्रीय सेवा प्रमुख विविध भारतीचे डॉ.संतोष जाधव ,ओम गायत्री ग्रुपचे मधुकर गवळी,इफकोच्या संचालिका साधना जाधव,राजविलास गायकवाड,सेंद्रिय शेतीतज्ञ सदुभाऊ शेळके,भारतीय अन्न महामंडळाचे सदस्य बापूसाहेब शिंदे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सह्याद्री फार्म्सचे संस्थापक अध्यक्ष विलास शिंदे हे होते.

लोकप्रिय आमची माती आमची माणसंचे संपादक प्रा.डॉ.संजय जाधव यांनी निमंत्रित केलेल्या या कार्यक्रमासाठी अखिल महाराष्ट्रातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शेतकर्यांना सपत्नीक सन्मानित केले.

याप्रसंगी शेतीचे किड नियंत्रण व पिकांची निकोप वाढीसाठी नवनवीन संशोधन पर औषधे तयार करणारे गनिभाई यांनी लोणी गाव व पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांचा हा सन्मान असल्याचे पंचनामाशी बोलताना सांगितले.

Related posts

पावसाने ओढ दिल्याने शिरदाळे परिसरात खरीप हंगाम धोक्यात ; सोयाबीन सह इतर पिके पावसाअभावी वाळली !!

Chief Editor

धामणी (लोणी) येथे उत्साहात संपन्न झाला प्रभू रामजन्म सोहळा !!

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायत झाली डिजिटल !!

Chief Editor

Leave a Comment