सामाजिक

जारकरवाडी सोसायटीकडुन पीककर्ज वाटप !!

img 20260409 wa0710(1)

पंचनामा प्रतिनिधी – जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथील विकास सोसायटीने ४९५ सभासदांना पुणे जिल्हा बँकेमार्फत खरीप हंगामासाठी चार कोटी बारा लाख पन्नास हजार पाचशे रुपयांची वाटप केल्याची माहिती संस्थेचे चेअरमन खंडू भोजने सचिव नवनाथ मंचरे यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचे परिपत्रक अद्याप विकास सोसायट्यांना न मिळाल्याने सभासद, कर्जदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे त्यामुळे संस्थेची वसुलीच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.
शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचे परिपत्रक लवकर जाहीर करावे अशी मागणी संस्थेचे चेअरमन खंडू भोजने व्हा.चेअरमन बाळासाहेब लबडे यांनी केली आहे.

fb img 1774661444136

मा. मंत्री आमदार दिलीप वळसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी विष्णू गायकवाड, विकास अधिकारी के.आर. वाळुंज यांच्या प्रयत्नांतून सभासदांना खरीप हंगामात जिल्हा बँके मार्फत वाटप करण्यात आले.

यावेळी संस्थेचे आजी माजी संचालक कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Related posts

भीमाशंकर कारखान्याची विनाकारण बदनामी करू नये – कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे

Chief Editor

चांडोलीतील सुवर्णा आव्हाडची शैक्षणिक भरारी; शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात ११ वा क्रमांक !!

Chief Editor

लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील शालेय विद्यार्थ्यांना ट्रेसेबल गिव्हींग फाउंडेशनच्या वतीने ६३०००/- रुपये किमतीच्या पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप !!

Chief Editor

Leave a Comment