सामाजिक

पोंदेवाडी (ता.आंबेगाव ) येथील रोडेवाडी फाटा येथे बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक कॅमेऱ्यांची जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केली पाहणी!!

img 20260409 wa0566
img 20260409 wa0566

पंचनामा प्रतिनिधी – पोंदेवाडी (ता.आंबेगाव ) येथील रोडेवाडी फाटा या महत्त्वाच्या चौकात पोलीस विभागाकडून बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक कॅमेऱ्यांची पाहणी करण्यात आली.

अष्टविनायक महामार्ग आणि बेल्हा-जेजुरी महामार्ग एकत्र येणाऱ्या या ठिकाणी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आली आहे.

मा. दिलीपराव वळसे पाटील तसेच मा. खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी या कॅमेऱ्यांची पाहणी केली.

या कॅमेऱ्यांमुळे वाहतूक नियंत्रण, नियमभंग ओळखणे, अपघातांची कारणे समजणे, तसेच आपत्कालीन मदत जलद मिळणे शक्य होणार आहे. याशिवाय गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही ही व्यवस्था उपयुक्त ठरणार आहे.

यावेळी पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज, अनिल वाळुंज, संदीप पोखरकर, साळवे, जोरी, सतीश घोलप, रामभाऊ वाळुंज व अन्य मान्यवर उपस्थित होते.

fb img 1774661449199

Related posts

आमरण उपोषणासाठी बसलेल्या धामणी गावच्या ग्रामस्थांना परिसरातील गावांनी दिला जाहीर पाठिंबा; पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत केली चर्चा !!

Chief Editor

राष्ट्रीय क्विझ स्पर्धेत “समर्थ फार्मसी” च्या रुचा कोरडेचे नेत्रदीपक यश२०० विद्यार्थ्यांवर मात करत पटकावले विजेतेपद; २५ पैकी २५ गुणांची कमाई, अवघ्या ४ मिनिटे १५ सेकंदांत प्रश्नमंजुषा पूर्ण !!

Chief Editor

समर्थ शैक्षणिक संकुलात निर्भय कन्या अभियानाचे आयोजन !!

Chief Editor

Leave a Comment