सामाजिक

धामणीच्या खंडोबा मंदिरात गुरुवारी संपन्न होणार दुसरा चंदनउटी सोहळा !!

img 20260331 wa0339
img 20260331 wa0339

पंचनामा प्रतिनिधी – धामणी (ता. आंबेगाव) श्री खंडोबाची चैञ पौर्णिमा ही महाराष्ट्रातील श्रीक्षेञ जेजुरीसह अनेक खंडोबाच्या स्थानात मोठ्या उत्साहाने व आनंदात साजरी केली जाते.या शुभदिनी भगवान शंकराच्या “मार्तंड भैरवाचा”(खंडोबाचा) विशेष उत्सव असतो.ज्यात स्वयंभू सप्तशिवलिंगाला चंदनउटी लेपन,भंडारा खोबर्‍यांची उधळण,तळीभंडार,पाच नामाची जागरण गोंधळ भराड,पालखी सोहळा,मानाच्या काठ्यांची मिरवणूक,सदानंदाचा येळकोट,येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात पूजा केली जाते.

चैञी पौर्णिमेच्या दिवशी खंडोबाच्या कुलधर्म कुळाचाराला खूप महत्व असते.खंडोबा अनेकांचे कुलदैवत आहे.त्यामुळे या दिवशी भाविकांच्या घरातील श्री खंडोबा म्हाळसाईच्या टाकाची पूजा करुन तळीभंडार व नैवेद्य दाखवला जातो.मल्हारी मार्तंड हा शंकराचा अवतार मानला जातो.माही पुनव व चैती पुनवेचा याञा सोहळा सर्वञ नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने विखुरलेल्या समाजातील सर्व वर्गांना एकञ आणते.

चैञ पोर्णिमेच्या दिवशी खंडेरायाच्या स्वयंभू सप्तशिवलिंगावर सुगंधी चंदनउटीचा लेप देऊन हळद (भंडारा) सुंगधी दवणा व फुले वाहीली जातात.येळकोटचा जयजयकार करुन आरती करण्यात येते.या दिवशी प्रत्येकांच्या घरोघरी पुरणपोळी व कुरडई पापडी भजीचा नैवेद्य देवाला दाखवला जातो.ज्या भाविकांना माही पुनवेच्या याञेला येणे शक्य होत नाही ते सहकुटुंब चैती पुनवेला तळीभंडार व पाच नामाची जागरण गोंधळ घालण्यासाठी आवर्जुन येत असतात.

खंडोबाला रविवारी दर महिण्याच्या पौर्णिमेला व सोमवतीला अभिषेक पूजा करुन दर्शन घेणे विशेष फलदायी मानले जाते.माही पुनव व चैती पुनवेला भाविकांमध्ये उत्सवी वातावरण असते धामणी (ता. आंबेगाव) येथील पुरातन श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात चैञ महिण्यातील दुसरा पारंपारिक वासंतिक चंदनउटी सोहळा चैञ पोर्णिंमेला गुरुवारी (२ एप्रिल २६) पहाटे होणार असल्याचे देवस्थानाचे सेवेकरी मंडळीनी सांगितले.

fb img 1773887073740

चैञ महिण्यातील गुढीपाडव्याला स्वयंभू सप्तशिवलिंगावर पहिले चंदनउटी लेपन करण्यात आले.चैञ पौर्णिमेला गुरुवारी दुसरा चंदनउटी लेपन होणार आहे.त्यानंतर या वर्षातील शेवटचे तिसरे चंदनउटी कार्यक्रम अक्षयतृतीयेला गुरुवारी (१९एप्रिल २६) होणार आहे.यंदाच्या चैञ महिण्यात गुढीपाडवा.रामनवमी व चैञ पोंर्णिमा गुरुवारीच आलेले असून हा विशेष योगायोग असल्याचे सांगण्यात आले.

Related posts

आमरण उपोषणासाठी बसलेल्या धामणी गावच्या ग्रामस्थांना परिसरातील गावांनी दिला जाहीर पाठिंबा; पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत केली चर्चा !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथील संकेत अस्वारे यांची मुंबई पोलिस मध्ये निवड !!

Chief Editor

वननेस वन – निसर्गासोबत समरसता ; हरित भविष्याच्या दिशेने संत निरंकारी मिशनची व्यापक जन चळवळ !!

Chief Editor

Leave a Comment