सामाजिक

सूर्य शक्ती प्रोजेक्ट अंतर्गत शेतीस उपयुक्त साहित्याचे लाभार्थ्यांना हस्तांतरण !!

img 20260331 wa0085

पंचनामा प्रतिनिधी – HOERBIGER CSR फंडाच्या माध्यमातून आणि TIME Employees India Foundation यांच्या अंमलबजावणीद्वारे “सूर्य शक्ती प्रोजेक्ट” अंतर्गत मिडगुलवाडी, केंदूर आणि कोंढापुरी या गावांमध्ये शेतीस उपयुक्त विविध सौर व तांत्रिक साधनसामग्रीचे वितरण करून प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला.

या प्रकल्पांतर्गत गरजू महिला बचत गट आणि शेतकरी बचत गट यांना सोलर पंप, फार्म स्ट्रीट लाईट, सोलर ड्रायर, ड्रिप, स्प्रिंकलर, IoT Weather Station, सोलर झटका मशीन आदी शेतीस उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले व प्रशिक्षण अंतर्गत लाभार्थीना सक्षम करण्यात आले.

या प्रकल्पाच्या यशस्वी पूर्णतेनिमित्त हँडओव्हर सेरेमनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास HOERBIGER चे श्री. अरुण वर्मा (Managing Director), श्री. माधव बच्छाव (Plant Operations Manager), सौ. संतती पाटील (Head – People & Culture), श्री. सतीश बढे (Manager – People & Culture) तसेच TIME Employees India Foundation चे Mr. Suman Kumar Gope (CSR Head) व Mr. Dhruv Mittal (Business Head) , दर्शना सावंत,
सौ सुचिता रोहन थिटे पंचायत समिती सदस्य शिरूर ,
श्री सुदाम आनंदराव पऱ्हाड सरपंच केंदूर ,
श्री सूर्यकांत रावसाहेब थिटे माजी सरपंच ,
श्री भाऊसाहेब सोपान थिटे माजी उपसरपंच ,
श्री सतीश दत्तोबा गावडे पोलीस पाटील ,
गणेश दशरथ थिटे ,(उद्योगपती)
नामदेव बाबाजी डुकरे माजी चेअरमन ,
दादासो पोपट थिटे,
संदीप मानाजी गावडे, उपस्थित होते.

मान्यवरांनी लाभार्थ्यांशी संवाद साधत सौर ऊर्जा, आधुनिक शेती आणि ग्रामीण विकास यांचे महत्त्व अधोरेखित केले.
हा प्रकल्प महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांची उत्पादकता वाढ आणि शाश्वत शेती विकास यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

fb img 1773887068819

Related posts

शाळेतील किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम !!

Chief Editor

ग्रामपंचायत जवळेचा अभिनव उपक्रम; एकल महिलांसाठी संपन्न झाला हळदी कुंकवाचा समारंभ!!

Chief Editor

समर्थ आय.टी.आय बेल्हे च्या ६३ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो कंपनी मध्ये ऑन जॉब ट्रेनिंगसाठी निवड !!

Chief Editor

Leave a Comment