
पंचनामा विशेष – एक अनुभवी तमाशा क्षेत्रातील माहितगार, कलेवर मनापासून प्रेम करणारे मा.राजेंद्र छगन काशीद मु.पो.बरड ता.फलटण यांचा जरी व्यवसाय शेती असला ,तरी तमाशा क्षेत्र हा जिव्हाळ्याचा विषय मानून ,त्यांना तमाशाची व वगनाट्याची आवड असून ते सुरुवातीपासून तमाशा कलेकडे ओढले होते.
मा.राजेंद्र काशीद यांची सन २००२ रामचंद्र वाडेकर या तमाशामध्ये मॅनेजर म्हणून काम करण्यास सुरुवात झालेली आहे.
त्यानंतर २००८ ते २०११ कै. कैलास अवघडे पिंपरीकर या तमाशामध्ये मॅनेजर म्हणून काम केले, नंतर २०११ते २०१६ या कलावधीत कै.कृष्णात वाघमोडे व पुष्पाताई बरडकर या तमाशामध्ये मॅनेजर म्हणून काम पहिले.नंतर २०१६ ते २०२६ आज अखेरपर्यंत सौ.गीतांजली सातारकर सोबत शेजू सातारकर या तमाशाफडामध्ये संस्थापक मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत.
तमाशा फडात मॅनेजर म्हणून काम करत असताना ,कष्ट,अनुभव, कौशल्य आणि चालू परिस्थितीची जाण मनात ठेवून श्री राजेंद्र काशीद हे काम करतात. येणाऱ्या यात्रा कमिटीशी चांगला सुसंवाद साधून ,त्यांना आपल्या तमाशाफडाची संपूर्ण माहिती देऊन ,कार्यक्रमाचे करार करतात.
फडाचा येणारा रोजचा खर्च, रनिंग याचा विचार डोळ्यासमोर ठेवून तमाशा फड नफ्यामध्ये कसा कार्यक्रम करेल याचे नियोजन त्यांच्या मनामध्ये असते. कमी दराच्या सुपा-यांमुळे तमाशाफड तोट्यात येणार नाही यासाठी दक्ष राहतात.

मा.राजेंद्र काशीद हे काळजमध्ये तमाशा ऑफिसमध्ये जरी असले तरी संपूर्ण लक्ष त्यांचे तमाशाफडाकडे लागलेले असते.कशाप्रकारे कार्यक्रम पार पाडले जातात, त्यावर त्यांचे बारीक लक्ष असते. कारण यात्रा कमिटीला मॅनेजरने चांगल्या कार्यक्रमाचा विश्वास व शब्द दिलेला असतो. या विश्वासाला ,शब्दाला जागले पाहिजे अशी काशीद यांची भूमिका असते.यात कसल्याप्रकारे ते मागे हटत नाहीत.

तमाशा पंढरी काळज येथे स्वतःच्या नावाची वेगळी प्रतिमा तयार केलेली आहे.स्वभाव स्पष्ट ,परखड ,कोणाची फसवणूक करायची नाही आणि शब्दाला जागणारा असल्यामुळे आपली बुद्धी, शक्ती ही तमाशाफडाकरीता व अडचणीत सापडलेल्या माणसांकरीता वापरायची असते याची जाण असल्यामुळे
मा.राजेंद्र काशीद यांना त्यांच्या गावामध्ये राजकीय ,सामाजिक इतर काही बाबींमध्ये मानाचे स्थान असते. त्यांनी आपल्या कार्य कौशल्यावर कुटुंब अतिशय मजबूत बनवलेले आहे.भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा
साभार लेख- राजेंद्र डी.मोरे बारामती
