सामाजिक

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बाजरी फुलोऱ्यात; पिकाची राखण करण्यात बळीराजा व्यस्त !!

1010734242
1010734242

लोगी, धामणी, वडगावपीर, मांदळेवाडी परिसरातील शेतकरी सुखावले !!

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोगी, धामणी, वडगावपीर, मांदळेवाडी परिसरात यंदा पावसाने चांगली हजेरी लावल्याने पावसाळी बाजरीचे पीक जोमात आले असून सध्या बाजरी फुलोऱ्यात आली आहे. पिकाची झालेली चांगली वाढ पाहून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.

यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पावसाळी बाजरीची लागवड केली आहे. बाजरी हे महत्त्वाचे धान्यपीक असून त्याचा धान्यासाठी उपयोग केला जातो. तसेच बाजरीच्या ताटाचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग होत असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे पीक महत्त्वाचे मानले जाते.

सध्या बाजरीचे पीक चांगलेच बहरले असून फुलोऱ्यात आले आहे. मात्र, पिकावर पाखरांचा उपद्रव होण्याची शक्यता असल्याने शेतकरी दिवसभर बाजरीच्या शेताची राखण करण्यात व्यस्त असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. यंदा पावसाची साथ मिळाल्याने बाजरीचे उत्पादन चांगले येण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

1010725695
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997

Related posts

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे येथे हार्डवेअर अँड नेटवर्किंग कार्यशाळा संपन्न !!

Chief Editor

प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे येथे वृक्षारोपण संपन्न !!

Chief Editor

पंचनामा विचारधन – कन्यादान

Chief Editor

Leave a Comment