सामाजिक

राजगुरूनगर येथे संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित रक्तदान शिबिरात 159 जणांनी केले रक्तदान !!

1010079761
1010079761

पंचनामा प्रतिनिधी – राजगुरूनगर (पुणे) : आध्यात्मिकताच मानवी एकता मजबूत करू शकते आणि माणसांना एकमेकांच्या जवळ आणून परस्पर प्रेम आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करू शकते. त्याच हेतूने निरंकारी ‘सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज’ यांच्या कृपाशीर्वादाने राजगुरूनगर (ता खेड,पुणे) येथे संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार, 05 जुलै 2026 रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये मिशनचे अनुयायी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन 159 युनिट रक्त संकलन संत निरंकारी रक्तपेढी-विलेपार्ले (मुंबई) 95 युनिट व YCM रक्तपेढी पिंपरी (पुणे) 64 युनिट मिळून रक्त संकलित करून देण्यात आले.

संत निरंकारी मिशनद्वारे निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला होता कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, तर ते नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’ म्ह्णून संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे अमलात आणला असून आज वर्तमान काळात निरंकारी ‘सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज’ यांच्या निर्देशानुसार निरंतर हा पुढे नेला जात आहे.

संत निरंकारी मिशन तर्फे राजगुरूनगर परिसरामध्ये मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः रक्तदान सह स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, नेत्र-आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन देखील केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.

रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशनचे अनुयायी यांचे विशेष योगदान लाभले. दरम्यान रक्तदान जागृती जनसामान्यांमध्ये व्हावी यासाठी राजगुरूनगर परिसरात घरोघरी जाऊन रक्तदानाचा संदेश देखील पोहोचविण्यात आला. या शिबीराचे उद्घाटन/शुभारंभ राजगुरुनगर नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ सुनंदाताई थिगळे व संत निरंकारी मिशन-भोसरी विभाग प्रमुख श्री अंगदजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे सौ सुनंदाताई यांनी प्रथमच स्वतः रक्तदान करून शिबिरास सुरुवात केली व या शिबिराला राजगुरुनगर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री मंगेशराव गुंडाळ सह नगरसेविका सौ सुप्रियाताई पिंगळे, नगरसेवक श्री किशोरभाऊ थिगळे सह राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक श्री विजयजी डोळस सह अनेक प्रतिष्टीत व्यक्ती, मान्यवर, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील या शिबिरास सदिच्छा भेट दिली. अनेक संत निरंकारी मिशनचे अनुयायी आवर्जून उपस्थित होते शेवटी आलेल्या सर्व रक्तदात्यांचे व मान्यवरांचे आभार राजगुरूनगर शाखेचे प्रमुख श्री बाळासाहेब जाधव यांनी मानले.

1010073642
1010074354
1009850407

Related posts

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रिस्तरीय बैठकीत सकारात्मक चर्चा ; मागण्यांबाबतचे विषय मंत्रिमंडळ उपसमितीसमोर ठेवण्याचा निर्णय !!

Chief Editor

शेतकऱ्यांच्या थकबाकी रक्कमेत तफावतीसंदर्भात योजनेच्या पोर्टलवरील थकबाकीची रक्कम ग्राह्य धरावी- सहकार आयुक्त दिपक तावरे

Chief Editor

विद्यार्थ्यांनी तणावमुक्त जीवन जगत सकस आहार व व्यायामाला प्राधान्य द्यावे ; निरगुडसर येथे विद्यार्थ्यांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रम !!

Chief Editor

Leave a Comment