सामाजिक

समर्थ कॉलेजमध्ये डिजिटल युगातील वर्तनात्मक वित्त विषयावरील FDPचे उद्घाटन !!

1010865573
1010865571

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे-बांगरवाडी येथील व्यवस्थापन विभागाच्या (MBA) वतीने AICTE Training and Learning (ATAL) Academyच्या प्रायोजकत्वाखाली ‘Experimental & Applied Behavioural Finance in Digital Era’ या विषयावर आयोजित सहा दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP)चे उद्घाटन उत्साहात झाले.

या कार्यक्रमासाठी कडलग गुंतवणूक सल्लागार, सुनील कडलग आणि चार्टर्ड अकाउंटंट गणेश बडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, MBA विभागप्रमुख डॉ. महेश भास्कर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना विश्वस्त वल्लभ शेळके यांनी आधुनिक युगात आर्थिक साक्षरता वाढविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. डिजिटल तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या विस्तारामुळे आर्थिक व्यवहार, गुंतवणुकीचे निर्णय तसेच ग्राहकांच्या आर्थिक वर्तनामध्ये मोठे बदल होत आहेत. या बदलत्या परिस्थितीत वर्तनात्मक वित्त या आधुनिक विषयाचा सखोल अभ्यास करून प्राध्यापकांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. डिजिटल युगातील आर्थिक निर्णयप्रक्रियेतील विविध पैलू समजून घेण्यासाठी हा FDP उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर अध्यापन क्षेत्रानेही काळानुरूप बदल स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगविश्वाच्या गरजा आणि बदलती अर्थव्यवस्था लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान व कौशल्ये देण्यासाठी प्राध्यापकांनी सातत्याने नवे ज्ञान आत्मसात करावे, असे त्यांनी सांगितले.

सुनील कडलक यांनी डिजिटल तंत्रज्ञानामुळे शिक्षण, उद्योग आणि आर्थिक व्यवहारांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत असल्याचे नमूद केले. अशा FDPच्या माध्यमातून प्राध्यापकांना नवीन संकल्पना, संशोधनात्मक दृष्टिकोन आणि आधुनिक अध्यापन पद्धती आत्मसात करण्याची संधी मिळते. यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास निश्चितच मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

या सहादिवसीय FDPमध्ये वर्तनात्मक वित्त, डिजिटल अर्थव्यवस्था, आर्थिक निर्णयांवर परिणाम करणारे मानवी वर्तन, गुंतवणूकदारांची मानसिकता, आर्थिक निर्णयप्रक्रियेतील मानसशास्त्रीय घटक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा आर्थिक व्यवहारांवरील परिणाम यांसह विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने, प्रशिक्षण सत्रे व शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच या विषयाकडे प्रायोगिक व अनुप्रयुक्त दृष्टिकोनातून पाहण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

1010865310

AICTE-ATAL Academy च्या प्रायोजकत्वामुळे या FDPला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, विविध शैक्षणिक क्षेत्रांतील प्राध्यापकांना आधुनिक व्यवस्थापन, वित्तीय क्षेत्र आणि डिजिटल अर्थव्यवस्थेशी संबंधित ज्ञान व कौशल्ये अद्ययावत करण्याची संधी मिळणार आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात अध्यापन अधिक परिणामकारक व उद्योगाभिमुख करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट हे AICTE, नवी दिल्ली मान्यताप्राप्त, महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाकडून मान्यताप्राप्त, NAAC मानांकित तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय आहे. व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित या FDPमुळे प्राध्यापकांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि व्यावसायिक विकासाला चालना मिळणार आहे.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके यांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रा.अमिता खंडागळे व प्रा. डॉ.शशिकांत ताजने यांनी केले, तर डॉ. रुस्तुम दराडे यांनी उपस्थित मान्यवर व सहभागींचे आभार मानले.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 379001

Related posts

भीमाशंकर कारखान्यास देशातील “वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” जाहीर !!

Chief Editor

धामणी (लोणी) येथे उत्साहात संपन्न झाला प्रभू रामजन्म सोहळा !!

Chief Editor

हरिनामाच्या गजरात शिंगवे गाव दुमदुमले,आनंदवारी दिंडीने जपली वारकरी परंपरा !!

Chief Editor

Leave a Comment