सामाजिक

लोणी (धामणी) ग्रामसभेत अवैध खाणपट्टा व क्रशरविरोधात एकमत ठराव !!

1009580181
1009580192

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील लोणी (धामणी) गावात ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत अवैध दगड खाणपट्टा, क्रशर व दगड वाहतुकीला तीव्र विरोध दर्शविला.

ग्रामसभेमध्ये खाणपट्टा आणि क्रशर हे प्रमुख मुदे चर्चेला घेण्यात आले असून, हे सर्व प्रकार बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ग्रामस्थांनी गावातील दगड खाण, क्रशर आणि दगड वाहतुकीमुळे परिसरातील नागरिक, शेतकरी व ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचा आरोप केला.

संबंधित खाण आणि क्रशरमळे शेजारील शेतीवर गंभीर परिणाम होत असून, क्रशरमधून उडणारी धूळ पिकांवर साचत असल्याने शेतीचे नकसान होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.अनेक शेतजमिनींची उत्पादकता घटत असून काही ठिकाणी जमीन नापीक होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच परिसरातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत दषित होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

ग्रामस्थांनी मांडलेल्या माहितीनुसार, दगड वाहतूक केली जाणारा रस्ता लोणी वाफगाव अस्रन याच परिसरात शाळा, मंदिर आणि शेती क्षेत्र रस्ता असल्याने मोठ्या वाहनांच्या वाहतुकीमुळे नागरिकांना सतत धोक्याचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.वाढते प्रदूषण, धूळ आणि वाहतुकीमुळे शेतकरी वर्ग हतबल झाल्याची भावना ग्रामसभेत व्यक्त करण्यात आली या सर्व प्रकारांविरोधात श्री. सखदेव आढाव यांनी सर्वप्रथम नक्रार दाखल केली होती. त्यानंतर ग्रामसभा ठराव, ग्रामपंचायत नोंदी आणि संबंधित कागदपत्रांच्या पडताळणीवरून अनेक विसंगती निदर्शनास आल्याचे प्रशासनाच्या अहवालातून समोर आले आहे.

ग्रामसभेतील ठरावाची नोंद ग्रामपंचायत इतिवृत्त नोंदवहीत नसल्याचे तसेच संबंधित अर्जाची आवक नोंद उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले डोते. तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांनीही संबंधित ठरावाची प्रत आपण दिली नसल्याचे जबाबात नमूद केले आहे. यावेळी ग्रामसभेत खाण मालक आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचेही
समोर आले. अवैध खाणपट्टा, क्रशर व दगड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांना सहकार्य केले जाईल, असे आश्वासन लोणी ग्रामपंचायत कड़न दिले होते.

दरम्यान, मालकाने आपण खाण शासनाकडे मोठ्या प्रमाणावर रॉयल्टी भरली असून ग्रामपंचायतीच्या परवानगीनंतरच खाण आणि क्रशर व्यवसाय सुरू केला असल्याचे सांगितले. तसेच या व्यवसायात मोठी आर्थिक गुंतवणूक केली असून दगड वाहतूकही नियमांनुसार केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. भविष्यात खाणपट्टा बंद झाल्यास होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मात्र यास ग्रामस्थांनी ग्रामपंचायत किंवा गावकरी जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट उत्तर दिले सदर ग्रामसभेला आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध मान्यवर, वरिष्ठ नेते तसेच २५० ते ३०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते विशेष म्हणजे महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.

ग्रामसभेत उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्यांनीही अवैध खाणपट्टा क्रशर आणि दगड वाहत्रक बंद करण्याच्या ठरावास मंजुर्र देत यासाठी पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली अवैध दगड आणि क्रशर वाहतूक न थांबल्यास आंदोलनाचा इशारा लोणी ग्रामस्थांनी दिला आहे अखेरीस सर्वाच्या एकमताने अवैध खाणपट्टा, क्रशर आणि दगड वाहतूक बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

fb img 1774661444136

Related posts

शाळेतील किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम !!

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात मोबाईल झालेत नॉट रिचेबल;पहाडदरा, शिरदाळे वडगावपीर,मांदळेवाडी ही गाव अनेक वर्षांपासून नेटवर्क पासून वंचित !!

Chief Editor

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघटनेच्या आंबेगाव तालुका अध्यक्षपदी श्री.के.डी.भोजने यांची बिनविरोध निवड तर सचिवपदी अतुल डामसे !!

Chief Editor

Leave a Comment