सामाजिक

विलास शिंदे यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती

1011440962
1011440962

पंचनामा प्रतिनिधी नाशिक – सामाजिक कार्यकर्ते विलास शिंदे यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशाने अपर जिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी शिंदे यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली.

शिंदे गेल्या ३२ वर्षांपासून लोकभारती समाज सेवा संस्था, नाशिकच्या सहकार्याने ग्रामीण भागात महिला बचतगट तसेच पंचायतराज कायद्याच्या प्रचार-प्रसाराचे कार्य करीत आहेत. तसेच उत्तर महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थांना मार्गदर्शन करण्याचे कामही ते करीत आहेत.

1011440911

विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिंदे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. लोकभारती संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा निलीमा साठे-शिंदे, जिल्हा नशाबंदी मंचाचे अविनाश आहेर, माजी संचालक गं. पा. माने, ॲड. गोरखनाथ बलकवडे, माजी सरपंच पी. के. जाधव, रमेश डंबाळे, जयराम मोंढे, माजी पोलीस निरीक्षक माणिक गायकर, ॲड. नितीन वडनेरकर, राजेंद्र नानकर व भुवनेश कडलग यांनी त्यांचे अभिनंदन केले.

1011430538
1011423306

Related posts

खेड्यापाड्यातही मोठ्या गणेशमूर्तींची धूम !!

Chief Editor

गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांनी बनविल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती !!

Chief Editor

नवल पगार यांना जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार !!

Chief Editor

Leave a Comment