सामाजिक

लोणी (धामणी) येथील माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न !!

1011412001

पंचनामा प्रतिनिधी लोणी – माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडली. संस्थेच्या वाढत्या कामाचा व्याप लक्षात घेऊन विविध शैक्षणिक व प्रशासकीय उपक्रमांना गती देण्यासाठी १८ सदस्यीय कार्यकारी मंडळाची स्थापना करण्यास सभेने मान्यता दिली. तसेच विविध कामांसाठी स्वतंत्र समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दुपारी १२ वाजता सभेची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, पुरेशी गणपूर्ती न झाल्याने सभा अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आली. त्यानंतर गणसंख्येचे बंधन नसल्याने सभेचे कामकाज सुरू करण्यात आले.

सभेच्या प्रारंभी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सचिव श्री. अविनाश वाळुंज यांनी वाचून दाखविले. त्यास सभेने मंजुरी दिली. यानंतर आर्थिक वर्ष २०२५-२६ चा संपूर्ण जमा-खर्च संस्थेचे खजिनदार श्री. बाळासाहेब गायकवाड यांनी सविस्तर सादर केला. हा जमाखर्च सभेने सर्वानुमते मंजूर केला.

संस्थेची सुमारे ४७ हजार चौरस फुटांची भव्य इमारत आकाराला आली असून, संस्थेची आर्थिक स्थिती अधिक भक्कम करण्यासाठी विविध ज्ञानशाखांचा विस्तार करण्याची गरज असल्याचे सभेत नमूद करण्यात आले. यासाठी प्रशासकीय व कार्यात्मक अधिकार असलेले कार्यकारी मंडळ स्थापन करण्याची सूचना अध्यक्ष श्री. उदयसिंह वाळुंज यांनी मांडली. त्यावर सभासदांनी सविस्तर चर्चा करून १५ ते २१ सदस्यांचे कार्यकारी मंडळ स्थापन करण्यास मान्यता दिली.

कार्यकारी मंडळासाठी सदस्यांची निवड करताना त्यांची पात्रता, काम करण्याची आवड, वेळ देण्याची क्षमता तसेच सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची क्षमता या बाबींचा विचार करण्याचे ठरले. मंडळात किमान तीन महिलांचा समावेश असावा, अशी भूमिकाही सभेत मांडण्यात आली. तसेच शालेय स्वच्छता समिती, विद्यार्थी प्रवेश समिती आणि समन्वय समिती आदी समित्यांची स्थापना करण्याचे निश्चित करण्यात आले.

कार्यकारी मंडळ

माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीच्या कार्यकारी मंडळावर पुढील सदस्यांची स्वेच्छेने नियुक्ती करण्यात आली :

माधुरी खंडागळे, गीतांजली लंके, किसन गायकवाड, प्रकाश वाळुंज, राजेश वाळुंज, प्रकाश सोनवणे, सुधीर सोनार, लक्ष्मण वाळुंज, संदीप पाटील आढाव, प्रकाश सिनलकर, अक्षय सुतार, संतोष वाळुंज, प्रदीप कोचर, दिलीप वाळुंज, राहुल भागवत, संतोष पोखरकर, कैलास सिनलकर आणि राजू वाळुंज (उपसरपंच).

दरम्यान, प्रबोधिनीच्या कार्यकारी मंडळात काम करण्यास इच्छुक असलेल्या सभासदांनी आपली नावे पिंटूशेठ पडवळ, साकोरे सर किंवा नवनीत सिनलकर यांच्याकडे द्यावीत, असे आवाहन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत जनजागृतीची गरज

सभेत गावातील विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशाचा मुद्दाही गांभीर्याने चर्चिला गेला. गावात भव्य व सुंदर शाळेची इमारत, तसेच शाळेचा चांगला निकाल असूनही गावातील अनेक विद्यार्थी अन्य गावांतील शाळांमध्ये प्रवेश घेत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. पालकांमध्ये जनजागृती करून गावातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा, यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे ठरले.

शाळेतील विविध प्रशासकीय अडचणी, मुख्याध्यापकांची कार्यप्रणाली, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील प्रभाव तसेच शिपायाच्या कार्यक्षमतेबाबतही सभासदांनी मुद्दे उपस्थित केले. याबाबत संस्थेच्या पातळीवर चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे प्रबोधिनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

कार्यकारी मंडळ स्थापनेच्या प्रस्तावास श्री. राजेश वाळुंज यांनी सूचक, तर श्री. प्रकाश वाळुंज यांनी अनुमोदक म्हणून भूमिका बजावली. अखेरीस प्रबोधिनीचे विश्वस्त श्री. मयूर लोखंडे यांनी आभार मानले. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता झाली. उपस्थितांना अल्पोपहार व चहाचे आयोजन करण्यात आले होते.

img 20261016 wa1042

Related posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे उत्साहात संपन्न झाला चिमुकल्यांचा आठवडे बाजार !!

Chief Editor

शेवभाजी…..!!

Chief Editor

राजुरी येथे जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्यंगिरा चंडीपाठाचे आयोजन !!

Chief Editor

Leave a Comment