सामाजिक

खेड्यापाड्यातही मोठ्या गणेशमूर्तींची धूम !!

1010795850
1010795852

परिसरात पीओपीसह शाडूच्या मूर्तींना मागणी; मूर्तिकारांची तयारी अंतिम टप्प्यात

पंचनामा प्रतिनिधी – येत्या काही दिवसांत होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील शहरांसह ग्रामीण भागातील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये लगबग वाढली आहे. विशेषतः खेड्यापाड्यातही आता मोठ्या आणि आकर्षक गणेशमूर्तींची धूम पाहायला मिळत आहे. गणेशमूर्तींना अंतिम रूप देण्यासाठी कारागीर दिवस-रात्र मेहनत घेत असून, यंदा पीओपीबरोबरच पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींनाही मोठी मागणी असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

आदर्शगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. रंगकाम, सजावट, वस्त्रांवरील नक्षीकाम आणि मूर्तींना अंतिम रूप देण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. आकर्षक रंगसंगती आणि पारंपरिक स्वरूपाच्या मूर्ती ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.

अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह नागरिकांनीही आपल्या पसंतीच्या मूर्तींसाठी आगाऊ नोंदणी केली आहे. ग्राहकांच्या आवडीनुसार विविध आकारांच्या आणि आकर्षक स्वरूपाच्या मूर्ती साकारण्यात येत आहेत.

जिल्ह्यात घाऊक स्वरूपात गणेशमूर्तींचा पुरवठा करणारे गावडेवाडी येथील मूर्तिकार श्रीधर आप्पा राजगुरू व प्रथमेश श्रीधर राजगुरू यांच्या कारखान्यात सध्या गणेशमूर्ती निर्मितीची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे.

तीन हजार मूर्तींची निर्मिती !!

गावडेवाडी येथील राजगुरू यांच्या कारखान्यात यंदा सुमारे तीन हजार गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. या सर्व मूर्ती ग्राहकांच्या पसंतीनुसार साकारण्यात आल्या असून, १० ते २५ हजार रुपये किमतीच्या मोठ्या मूर्तींना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विशेष मागणी आहे. घरगुती गणेशमूर्तींसह पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींनाही चांगली मागणी असल्याचे मूर्तिकार प्रथमेश श्रीधर राजगुरू यांनी सांगितले.

पीओपी मूर्तींनाही पसंती

आकर्षक रंगसंगती, कमी वजन आणि तुलनेने परवडणारी किंमत यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींना बाजारात मोठी मागणी असल्याचे मूर्तिकार श्रीधर राजगुरू यांनी सांगितले. प्रशासनाकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत असले, तरी पीओपी मूर्तींची विक्रीही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

1010795850

कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे पर्यावरणप्रेमींकडून जलप्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करत शाडूच्या मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मोठ्या मूर्तींकडे वाढता कल !!

पूर्वी ग्रामीण भागात प्रामुख्याने लहान आकाराच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जात होती. मात्र बदलत्या काळानुसार आता खेड्यापाड्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही मोठ्या, आकर्षक आणि कलात्मक गणेशमूर्तींना पसंती देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून मोठ्या मूर्तींची मागणी वाढल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथील गणेशमूर्ती कारखान्यात मूर्तींना अंतिम रूप देण्यासाठी कारागीर लगबगीने काम करत आहेत.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 379001
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997

Related posts

रक्षाबंधन सणानिमित्त बंदी निर्मित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उद्घाटन ; कारागृह हे केवळ शिक्षेचे ठिकाण नसून ते सुधारगृह- डॉ. सुहास वारके

Chief Editor

यात्रा जत्रात तमाशाच्या आयोजनासाठी गाव पुढाऱ्यांना कला प्रेमींची भावनिक साद !!

Chief Editor

भीमाशंकर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पूजन !!

Chief Editor

Leave a Comment