सामाजिक

आता थांबायला हवं !!

1009562693

मोहन वामने
8087459030
24 मे 26
12 वाजून 10 मिनिट

1009562693

मागच्या आठवड्यापासूनच तिची मानसिकता तयार झालेली होती. दोन तीन घरातून, “वाणवळा “आलेला होता, त्यामुळं अजून बेचैनी वाढली होती तिची….!

शेवटी निर्णय घेतलाच तीने मनाशी, एक किलो तांदूळ, आणि एक किलो गहू भिजायला टाकले तीने…..!

पद्धती प्रमाणे तीन चार दिवस भिजवून ठेवावे लागतं असावेत ते…..!

38 वर्ष झाली आता त्याला,या घरात येण्यापूर्वीपासून तिच्या माहेरी सुद्धा, कुरडई, पापडया, शेवया, सांडगे इत्यादी उन्हाळी काम करायची थोडीफार सवय आणि माहिती तिला होतीच…..!

इकडची झाल्यापासून, आईच्या मार्गदर्शना खाली तिची या कामातील आवड, रुची आणि सराव खूप वाढीस लागला होता….!

दरवर्षी नित्य नियमाने ती ही उन्हाळी काम करीत असे…..!

आईच्या निधनानंतर तिला या कामातील मौलिक सूचना देणारे घरात कुणीच राहिलं नाही….!

पण ती तशी कुणावर अवलंवून न राहता, जमेल तसं ही काम करीत होतीच….!

मागील चार पाच वर्ष शरीरातील जोर कमी झाला होता, शरीराची “गात्र “सुद्धा थकली होती आता त्यामुळे कुरडई करताना सगळ्यात जास्त कष्ट पडत असावेत…..!

भिजवलेले गहू आदल्या दिवशीच त्याचा चीक काढण्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे तो चीक,”हाटवणे “ही खूप मोठी कसरत करुन, गार होण्यापूर्वी सोऱ्यात भरलेला चीक, विशेष कसब वापरून गोलाकार पद्धतीने आणि एक सारख्या आकार धारण केलेल्या कुरडई उन्हात वा ळायला घालणे, खूप कष्टाचं होत. पण उत्साह कमी न करता ती करीत असे नेहमीच…..!

आज सकाळी मला ते खास जाणवलं, आणि वाटलं,”थांबायला पाहिजे तिनं आता “….!

निर्मितीचा आनंद नक्कीच मिळवत असेल ती, पण निर्मिती बरोबर आपण निर्मिलेल्या वस्तूचा उपभोग घेणारे जवळपास असतील तर आणि तरच त्या निर्मिती मधील आनंद आपण उपभोगू शकतो….!

एखाद्या दुसऱ्या सणाला कुरडई, पापडी ताटात येणं हा काही आनंद नाही, पूर्वी सण म्हटला की भजी पासून सर्व प्रकारच्या,”तळण “ने अर्ध ताट भरून जात असे. आता घरातील ती सर्व ” ताट ” घरातील फर्निचर च्या वरच्या कप्प्यात जाऊन बसलीय, आणि ताटाची जागा ताटल्यानी घेतलीय…..!

आता जेवणात,”पापड “सोडला तर दाता खाली, कुर्रर्र आवाज काढणारा एकही पदार्थ राहिलेला नाही….!

तळणाचे पदार्थ खाणारा, खवय्या सुद्धा आता तोंडातील शिल्लक दात मोजूनच जेवतोय….!

म्हणून सांगणार आहे आजच तिला,
! आत्ता थांब l

fb img 1774661449199

Related posts

समर्थ फार्मसी विद्यार्थ्यांची पुण्यातील नामांकित कंपनीत घवघवीत भरारी ;सिलिकंट प्रा. लि. मध्ये २६ विद्यार्थ्यांची निवड !!

Chief Editor

धामणीत पाडव्याच्या मुहर्तावर खंडोबाला चंदनउटी !!

Chief Editor

कृषिरत्न डॉ.पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्काराने लोणी (ता.आंबेगाव) येथील ज्येष्ठ शेतिनिष्ठ शेतकरी गनिभाई हुसेन सय्यद सन्मानित!!

Chief Editor

Leave a Comment