सामाजिक

भीमाशंकर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर !!

1009583450
1009583450

पंचनामा प्रतिनिधी – दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक मा.आ.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा. संचालक मंडळाच्या निर्णयानुसार लागवड हंगाम २०२६-२७ मधील ऊस लागवड धोरणाची अंमलबजावणी २५ मे पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन श्री. बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना बेंडे म्हणाले की, ऊस लागवडीसाठी २५ मे २०२६ ते ३१ मार्च २०२७ पर्यंतच्या कालावधीमध्ये को.एम. ०२६५ व दि.२५ मे २०२६ ते ३० एप्रिल २०२७ पर्यंत को.८६०३२ उस लागवडीस व नोंदीस परवानगी दिलेली आहे. दि. १ ऑगस्ट २०२६ ते ३० एप्रिल २०२७ पर्यंत व्हि.एस.आय. ०८००५ ऊस लागवडीस, दि. १ सप्टेंबर २०२६ ते ३० एप्रिल २०२७ पर्यंत एम.एस.१०००१, फुले ९०५७ ऊस लागवडीस तसेच दि.१ जून २०२६ ते ३० एप्रिल २०२७ पर्यंत को.व्हि.एस.आय.१८१२१, फुले ऊस १५०१२, फुले ऊस १५००६, फुले ऊस १३००७, को.एम.११०८२ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे.

कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे उपलब्धतेनुसार लागवड धोरणाप्रमाणे दि.२५ मे २०२६ पासून वरील ऊस जातीचे बेणे वाटप करण्यात येणार आहे. तसेच दि. २५ जून २०२६ पर्यंत कधीही लागवड केलेल्या ऊस रोपांची ऊस नोंद दि. २५ मे २०२६ नोंद तारीख राहील. त्यानंतर रोपांपासून ऊस लागवड केलेल्या उसाची नोंद १ महिना अगोदर केली जाईल व खासगी ऊस लागवडीच्या नोंदी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतक-यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा ७/१२ उतारा व आवश्यक कागदपत्रे पुर्तता संबधित विभागीय शेतकी कार्यालयात देऊन बेणे मागणी नोंदवावी. खासगी ऊस लागवड केलेल्या शेतक-यांनी चार दिवसाचे आत संबंधित गट ऑफिसला येवून ऊस नोंद करावयाची आहे. त्यानंतर उशीरा ऊस लागवड नोंद करणेस आलेल्या ऊस उत्पादकांची ऊस नोंदीसाठी आलेची तारीख हीच ऊस लागवड तारीख म्हणून नोंद करण्यात येईल.

कारखान्यामार्फत कार्यक्षेत्र व परिसरामध्ये दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष २०२० या उधारीने / रोखीने राबविणेत येणा-या ऊस विकास योजने अंतर्गत माती परीक्षण सुविधा, ताग बियाणे वाटप, ऊस बेणे वाटप, रासायनिक खते पुरवठा, द्रवरुप जीवाणू खते, ऊस रोपे वाटप, खासगी ऊस लागवड अर्थसहाय्य, प्रेसमड, खोडवा व्यवस्थापनामध्ये पाचट कुट्टी सुविधा, ठिबक सिंचन योजना, व्हीएस.आय.चे मल्टीमायक्रोन्युट्रीएंट, मल्टीमॅक्रोन्युट्रीएंट, ह्युमिक अॅसिड, वसंत उर्जा, जैविक कीटकनाशक बी.व्ही.एम., ई.पी.एन. इ.चा पुरवठा करण्यात येईल, हंगामवार ऊस पिक स्पर्धा इ. ऊस विकास योजनांचा लाभ सर्व ऊस उत्पादकांनी घेणेत यावा. ऊस पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक शेतक-यांनी आपले प्रवेश शुल्क रु.१००/- डिसेंबर २०२६ अखेर भरुन नाव नोंदणी करावी.

एकात्मिक कीड व्यवस्थापन योजनेमध्ये ऊस पिकामध्ये हुमणी कीडीचे नियंत्रणासाठी शेतक-यांनी गोळा केलेले हुमणी कीडीचे भुंगेरे कारखान्यामार्फत प्रति किलो रु.३००/- प्रमाणे माहे जून २०२६ अखेर खरेदी केले जाणार असून शेतक-यांनी हुमणीचे भुंगेरे गोळा करुन एकात्मिक कीड नियंत्रण करावे.

तरी वरील लागवड धोरणानुसार जास्तीत जास्त शेतक-यांनी ऊसाची लागवड करावी व कारखाना ऊस विकास योजनांचा लाभ घ्यावा. ऊस विकास योजनेच्या अधिक माहितीसाठी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन व्हाईस चेअरमन श्री. प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

fb img 1774661449199

Related posts

समर्थ संकुलात वन्यजीव व मानव संघर्ष या विषयावर मेजर रमेश खरमाळे यांचे मार्गदर्शन !!

Chief Editor

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथील जेष्ठ आणि तरुणांच्या श्रमदानातून वटवृक्षाला बनवला ओटा !!

Chief Editor

समर्थ संकुलामध्ये इलेक्ट्रॉनिक्स म्युझियम चे नवे दालन सुरू !!

Chief Editor

Leave a Comment