सामाजिक

न्यू इंग्लिश स्कूल लाखणगावच्या विद्यार्थिनींना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप !!

img 20260105 wa0434
img 20260105 wa0434

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र पुणे,संचलित न्यू इंग्लिश स्कूल लाखणगाव (ता.आंबेगाव ) शाळेत राजमाता जिजाऊ भोसले जयंती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली व या निमित्ताने नांदी फाउंडेशन पुणेच्या प्रोजेक्ट नन्हीकली योजने अंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थिनींना ४५००० हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य किटस्चे मोफत वाटप मुख्याध्यापक अनिल देसले व निर्देशक लक्ष्मी बोंबे यांचे हस्ते करण्यात आले. या शैक्षणिक साहित्यात शूज,सॉक्स,टी-शर्ट,वही,पेन व आवश्यक ते सर्व साहित्य नांदी फाउंडेशन पुणे, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड,महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस व थ्री एम्स यांच्या विशेष आर्थिक योगदानातून शाळेतील मुलींना उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती नांदी फाउंडेशनच्या कार्यक्रम अधिकारी वर्षा चौधरी यांनी दिली.

यावेळी विद्यार्थिनींचे मनोगते झाली. यावेळी सर्व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.

लाखणगाव (ता.आंबेगाव) येथील न्यू इंग्लिंश स्कूलच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप.

Related posts

जांभोरी येथे गणेशोत्सवानिमित्त ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम उत्साहात संपन्न !!

Chief Editor

समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, बेल्हे येथे ‘नशामुक्त युवा अभियान’ उत्साहात संपन्न !!

Chief Editor

शिरदाळे येथे शनिवारी संपन्न होणार दक्षिणमुखी हनुमान भंडारा सोहळा !!

Chief Editor

Leave a Comment